Home /News /national /

पंतप्रधान झाल्यानंतरही गुजरातला विसरले नाहीत मोदी! 'या' निर्णयांवरुन होतंय स्पष्ट

पंतप्रधान झाल्यानंतरही गुजरातला विसरले नाहीत मोदी! 'या' निर्णयांवरुन होतंय स्पष्ट

डोनाल्ड ट्रम्प, डब्ल्यूएचओचे महासंचालक ते यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या यजमानपदापासून, पंतप्रधान मोदींनी केवळ दिल्लीच नाही तर इतर राज्यांनाही जागतिक नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची संधी दिली आणि गुजरात त्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे, असे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 26 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाचे पंतप्रधानपद स्वीकारून आज (26 मे 2022) आठ वर्षं (Modi@8) पूर्ण होत आहेत. या आठ वर्षांतल्या त्यांच्या कारकीर्दीबाबत विचारलं असता, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. पटेल म्हणाले, की गुजरातच्या प्रगतीसाठी मोदींनी गेल्या आठ वर्षांतच नाही, तर 2001 पासूनच विशेष लक्ष दिलं आहे. या वेळी पंतप्रधान मोदींनी गुजरातसाठी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबतची माहिती पटेल यांनी दिली. सरदार सरोवर डॅम मोदींनी (PM Modi) स्वतःचं आयुष्य नवभारताच्या (New india) निर्माणासाठी समर्पित केलं आहे. याची चुणूक त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधूनच दिसून येते. पंतप्रधान मोदींनी नर्मदा योजनेअंतर्गत सरदार सरोवर धरणाचे (Sarovar Dam) दरवाजे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. इथूनच त्यांच्या नवभारताच्या निर्मितीची यात्रा सुरू झाली, असं मत पटेल यांनी व्यक्त केलं. हा प्रोजेक्ट गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या चार राज्यांसाठी महत्त्वाचा होता. समितीच्या परवानगीनंतर अखेर 16 जून 2017 रोजी हे दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.75 टक्क्यांनी वाढून 4.73 दशलक्ष क्युबिक मीटर एवढी झाली. हे दरवाजे बंद करण्याची गुजरातची मागणी बरीच वर्षं प्रलंबित होती. खनिज तेलामध्ये गुजरातचा डंका 2014 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पुढच्याच वर्षी मोदींनी गुजरात सरकारला 763 कोटी रुपये मंजूर केले. हा निधी राज्याच्या प्रमुख गरजा भागवण्यासाठी आणि खनिज तेलांच्या रॉयल्टीसाठी (Crude oil Royalty) देण्यात आला होता. हा मुद्दा त्या वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता. त्यामुळे पंतप्रधानांनी वेळीच कार्यवाही करून राज्याला पैसे देण्याचा निर्णय घेणं गुजरातच्या फायद्याचं ठरलं. राजकोटमध्ये एम्स ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ म्हणजेच एम्सची (AIIMS Rajkot) शाखा गुजरातमध्येही असावी अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना ही गरज लक्षात आली होती. त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी राजकोटमध्ये एम्स उभारण्यास मंजुरी दिली. 2020 च्या डिसेंबरमध्ये त्यांनी या इमारतीची पायाभरणी केली.

  PM मोदींचे 24 तास : साडेतीन तास झोप, 18 तास काम, सकाळी या गोष्टीने करतात दिवसाची सुरुवात

  लाइटहाउस प्रोजेक्ट विविध ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसार टिकाऊ घर देणं हे लाइटहाउस योजनेचं (Lighthouse project) उद्दिष्ट आहे. त्रिपुरा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. राजकोट शहरात या योजनेअंतर्गत 1,144 घरं बांधली गेली आहेत. ही घरं भूकंप, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सक्षम आहेत. बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई ही देशाची दोन बिझनेस सेंटर्स म्हणता येतील अशी शहरं आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही दोन शहरं बुलेट ट्रेनने (Mumbai-Ahmadabad Bullet train) जोडण्यात येणार आहेत. 14 सप्टेंबर 2017 रोजी या प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आली होती. त्या वेळी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेदेखील उपस्थित होते. या प्रकल्पासाठी गुजरातमधल्या आवश्यक जमिनीपैकी 98 टक्के जमिनीचा ताबा घेतला गेला असल्याचं पटेल यांनी सांगितलं. स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत रेल्वे सेवा गेल्या काही वर्षांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातमधलं एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ झालं आहे. 182 मीटर उंच पुतळा पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक गुजरातमध्ये येतात. या पर्यटकांच्या सुविधेसाठी पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत (Statue of unity) जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे 2021च्या जानेवारीमध्ये उद्घाटन केलं. केवडिया रेल्वे स्टेशन (Kewadiya Railway station) हे तिथल्या स्थानकाचं नाव आहे. सध्या या मार्गावरून भारतीय रेल्वेच्या आठ गाड्या जातात. विद्यापीठांना राष्ट्रीय दर्जा गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (GFSU) आणि रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी (आताचं नाव - राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी) या दोन विद्यापीठांना केंद्र सरकारने 2020 साली राष्ट्रीय विद्यापीठांचा दर्जा दिला. यासाठी संस्कृती, पर्यटन आणि नॉर्थ इस्ट भागाच्या विकासासाठीचे राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी संसदेत विशेष विधेयक मंजूर केलं होतं. विशेष म्हणजे, ही दोन्ही विद्यापीठं पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात उभारली गेली होती. सोबतच, गुजरात आयुर्वेद विद्यापीठालाही (Gujarat Ayurved University) पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला. हे विद्यापीठ आता स्वायत्तदेखील होत आहे.

  Modi@8: पंतप्रधानांची जादू आजही कायम तर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस निष्प्रभ

  भारतातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ 2018 साली शिक्षक दिनी पंतप्रधान मोदींनी देशातल्या पहिल्या रेल अँड ट्रान्स्पोर्ट युनिव्हर्सिटीचं (Rail and Transport University) उद्घाटन केलं. बडोद्यामध्ये असलेलं हे विद्यापीठ ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजीमधल्या बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण देते. ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन गेल्याच महिन्यात पंतप्रधान मोदींनी WHO 'ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन'ची जामनगरमध्ये पायाभरणी केली. त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस घेब्रेयेसस (Tedros Ghebreyesus), मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनौथ (Pravind Kumar Jugnauth) आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेदेखील उपस्थित होते. या सेंटरमुळे ट्रॅडिशनल मेडिसिनसाठीचं एक जागतिक केंद्र म्हणून गुजरात उदयास येणार आहे. ग्रीन एअरपोर्ट पंतप्रधान मोदींनी राजकोटमध्ये ग्रीनफील्ड एअरपोर्टची (Green Airport) सुरुवात केली आहे. अहमदाबाद-राजकोट हायवेवर असणारा हा एअरपोर्ट सुमारे एक हजार हेक्टर जागेत बांधण्यात येईल. यासाठी अंदाजे 1405 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या विमानतळामुळे गुजरातचा विकास होईलच; मात्र देशातली निर्यातदेखील वाढण्यास मदत होईल. जागतिक नेते गुजरातमध्ये यापूर्वी जगभरातले नेते किंवा मोठ्या व्यक्ती जेव्हा भारतात येत होत्या, तेव्हा त्यांना केवळ दिल्लीमध्ये आणलं जायचं; मात्र दिल्लीसोबतच इतर राज्यांनाही समान दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळेच पंतप्रधानांनी कित्येक जागतिक नेत्यांचं स्वागत दिल्लीत न करता गुजरातमध्ये केलं आहे. 2014 मध्ये पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping Gujarat visit) यांना भारतभेटीचं निमंत्रण दिलं होतं. या दोघांनी साबरमती नदीकिनाऱ्यावर चर्चा केली होती. त्यानंतर 2017 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe Gujarat visit) अहमदाबादला आले होते. जानेवारी 2018 मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या पहिल्याच भारत दौऱ्यात अहमदाबादला भेट दिली होती. 2020 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump in Gujarat) यांनीदेखील गुजरामधील नरेंद्र मोदी स्टेडियमला भेट दिली होती. या वर्षी एप्रिलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनौथ यांनी गुजरातमध्ये काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM in Gujarat) यांनीही गुजरातला भेट दिली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजरात दौरा करणारे ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान ठरले. एकूणच पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण देशाची जबाबदारी सांभाळत असतानाही पंतप्रधान मोदी गुजरातला विसरले नाहीत.
  First published:

  Tags: Gujrat, Pm modi

  पुढील बातम्या