नवी दिल्ली, 16 मे : लग्नाच्या निमंत्रण पत्रिका हटके आणि खास बनवण्याकडे अनेकांचा कल असतो. आता सोशल मीडियावर नौदलातील एका पायलटनं लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं पत्र व्हायरल होत आहे. त्यासाठी त्यानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, मला गोळी खाण्याची परवानगी द्या. त्याच्या या पत्राला उत्तर देताना अधिकाऱ्यानं लिहिलं की नरकामध्ये स्वागत. दोघांचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोव्यात भारतीय नौदलात लेफ्टनंट असलेल्या निशांत सिंगने आयएनएएस 300 च्या उच्च अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं होतं. निशांतने 9 मे ला लिहिलेल्या पत्रात लग्न करणार असल्याची माहिती दिली. त्यानं लिहिलं की, इतक्या कमी वेळात हा बॉम्ब तुमच्यावर डागण्याचं दु:ख आहे पण तुम्हीही यासाठी परवानगी द्याल. मी स्वत: एक अणुबॉम्ब टाकायला जात आहे आणि मला वाटतं की युद्धाच्या काळात जशी परिस्थिती पाहून आपण तात्काळ निर्णय घेतो तसंच सध्याच्या परिस्थितीला पाहून मी दुसऱ्यांदा विचार करू शकत नाही.
निशांतने म्हटलं की, वरील विषयाबाबत मी अधिकृतपणे अत्यंत शांत डोक्यानं बलिदान करण्यासाठी तुमच्याकडून मंजुरी मागतो. पूर्णपणे कर्तव्याच्या रेषेबाहेर आणि वैवाहिक जीवनाच्या या कब्रस्तानात मी इतर शूर पुरुषांचा साथी होऊ इच्छितो.
Mercifully some guys still have a sense of humour and this breed is dying fast! pic.twitter.com/MWRKWTzlnx
— Anil Talwar (@aniltalwar2) May 14, 2020
वरिष्ठ अधिकाऱ्याला लग्नाचं निमंत्रण देताना निशांतनं म्हटलं की, 'मी वचन देतो की ड्युटीवर पुन्हा कधी असं काही करणार नाही. किंवा आपल्या प्रशिक्षणासाठी आलेल्या पायलटना असं काही शिकवणार नाही.' लग्नासाठी निमंत्रण देताना असं पत्र लिहिल्यानंतर त्याला उत्तरही तसंच मिळालं आहे.
Gem of a letter. #MustRead.
Here's wishing Lt. Cdr. Nishant Singh the barrel roll of a lifetime. https://t.co/CNnXLS1GhF
— Tapashish Chakraborty (@TapashishC) May 15, 2020
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लाल अक्षरात पत्र पाठवलं आहे. त्यात म्हटलं की, तुझ्या सुरुवातीच्या काळात मी तुझा प्रशिक्षक होतो. एसीपी म्हणून तुम्हाला मिग विमानाचे उड्डाण करताना पाहणं माझ्यासाठी अभिमानास्पद होतं. तुझ्यातला उत्साह पाहिला. मला माहिती होतं की तु वेगळा आहेस. पण चांगल्या गोष्टींचा शेवट होतो. आता नरकात तुझं स्वागत आहे. पायलटचं लग्न झाल्याची माहितीही अधिकाऱ्याने दिली आहे.
हे वाचा-फ्रिजची सफाई करताना सापडली 25 वर्षांपूर्वीची पेस्ट्री, पाहा कुटुंबाने काय केलं
हे वाचा-दफनभूमीत मृतानं केलं बाय बाय; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम
संपादन- क्रांती कानेटकर