नवी दिल्ली, 3 मार्च : 1 एप्रिलपासून केंद्र सरकार नोकरदार वर्गासाठी मोठे बदल करू शकते. नोकरदार वर्गाची ग्रॅच्युटी, पीएफ आणि काम करण्याच्या तासांमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. त्याशिवाय कंपन्यांच्या बॅलेन्स शीटमध्येही अनेक बदल होऊ शकतात.
मागील वर्षी संसदेत पास झालेल्या तीन वेतन संहिता विधेयकामुळे (कोड ऑन वेजेज बिल) हे बदल होऊ शकतात. त्यामुळे 1 एप्रिलपासून नवे बदल लागू होण्याची शक्यता आहे. काय होणार बदल?
- सॅलरीमध्ये होणार बदल
सरकारच्या योजनेनुसार, 1 एप्रिलपासून मूळ वेतन एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. या बदलामुळे नियोक्ता आणि कामगार दोघांनाही फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.
- पीएफ (PF)
नव्या नियमांनुसार, पीएफमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी कमी मिळू शकते. मूळ वेतन एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक असल्याने, या बदलानंतर अधिकतर लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो.
- 12 तास काम करण्याचा प्रस्ताव
जास्तीत जास्त कामाचे तास 12 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. सध्या 30 मिनिटांहून कमी वेळ एक्स्ट्रा काम केल्यास, तो ओव्हरटाईममध्ये येत नाही. परंतु आता 15 ते 30 मिनिटांपर्यंत एक्स्ट्रा काम केल्यानंतर तो वेळ ओव्हरटाईममध्ये सामिल करण्याची तरतूद आहे.
- 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक
5 तासांहून अधिक वेळ सलग काम करण्यावर प्रतिबंध केला जाईल. सलग 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जावा, असं सांगण्यात आलं आहे.
- रिटायरमेंट रकमेत वाढ
पीएफची रक्कम वाढल्याने रिटायरमेंटच्या रकमेतही वाढ होईल. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्याने कंपन्याच्या किंमतीत वाढ होईल, कारण कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये अधिक वाटा द्यावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Employment, India, Modi government, Money, Pf, PF Amount, Salary