जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सावधान! Savings Account वापरात नसेल तर लगेच बंद करा; होऊ शकतं नुकसान

सावधान! Savings Account वापरात नसेल तर लगेच बंद करा; होऊ शकतं नुकसान

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेच्या (Aditya Birla Idea Payments Bank) बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत बँकिंग कंपनीचा दर्जा हा   संपला आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये RBI ने म्हटलं होतं की, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने स्वत:च्या इच्छेने हा व्यवसाय संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही या बँकेत व्यवहार करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेच्या (Aditya Birla Idea Payments Bank) बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत बँकिंग कंपनीचा दर्जा हा संपला आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये RBI ने म्हटलं होतं की, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने स्वत:च्या इच्छेने हा व्यवसाय संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही या बँकेत व्यवहार करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

एकापेक्षा अधिक बॅंकांमध्ये तुमचे जर सेव्हिंग अकाऊंट (Bank Saving Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यातलं एखादं तुम्ही फारसं वापरत नसाल तर सावधान! वेळीच ते बंद करा.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 मार्च:  एकापेक्षा अधिक बॅंकांमध्ये तुमचं जर सेव्हिंग अकाउंट (Saving Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही असे खाते उघडले असेल तर आणि त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर ते खातं तातडीनं बंद करणं गरजेचं आहे. अर्थिक सल्लागारांच्या मते, वापरात नसलेलं बॅंक खातं (Bank Account) बंद करणं हे केव्हाही फायदेशीर असतं. गरजेपेक्षा जास्त बॅंक खाती असल्यास ही बाब नुकसानदायी ठरते. आपण जेव्हा नोकरी बदलतो किंवा नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो अशावेळी अन्य गरजांमुळे सेव्हिंग अकाऊंटसची संख्या वाढते. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सेव्हिंग अकाउंट्स असतील तर ही बाब कशी नुकसानदायी ठरते हे जाणून घेऊ या… किमान बॅलन्स ठेवणे अपरिहार्य तुमची जितकी सेव्हिंग अकाउंट असतील ते प्रत्येक अकाऊंट सुरु ठेवण्यासाठी त्यात किमान बॅलन्स (Minimum Balance)  ठेवणं गरजेचं असतं. हे नुकसानच म्हणावं लागेल. महिन्याला सरासरी बॅलन्स ठेवण्यासाठी बॅंक आपल्या पॉलिसीनुसार तुमच्या खात्यातून पैसे कापून घेऊ शकते. सर्व बॅंकांच्या रेग्युलर सेव्हिंग अकाउंटसाठी हा नियम लागू आहे. त्यामुळे तुमच्यासमोर केवळ 2 पर्याय राहतात. त्यापैकी एक म्हणजे महिन्याला सरासरी बॅलन्स शिल्लक राहण्यासाठी ठराविक रक्कम सेव्हिंग खात्यात जमा करावी किंवा दुसरा पर्याय म्हणजे बॅंकेला पैसे कापू द्यावेत. डेबिट कार्डचे चार्जेस द्यावे लागतील जर तुम्ही तुमचे अकाऊंट वापरत नसाल तरी देखील तुम्हाला डेबिट कार्डचे चार्ज (Debit Card Charges) द्यावे लागतील. ही फी त्या निरुपयोगी खात्यातून आपल्याला मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल. बॅंक खाते उघडण्यासाठी स्वतंत्र शुल्क नसतं. परंतु, बऱ्याच बॅंका त्यांच्या डेबिट कार्डवर काही ठराविक फी आकारतात. ही फी वर्षाला 100 ते 1000 रुपये असते.  याव्यतरिक्त काही बॅंका तुम्हाला फोनवर मेसेज करण्याचेही चार्जेस वसूल करतात. हा चार्ज तीन महिन्याला 30 रुपये असू शकतो. दंड भरावा लागू शकतो जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलन्स ठेवू शकत नसाल तर तुम्हाला बॅंकेच्या नियमांनुसार दंड (Fine) भरावा लागतो. हा दंड वाचवण्यासाठी तुम्हाला खात्यात किमान बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. या किमान बॅलन्सची मर्यादा ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि मेट्रोसिटीमध्ये वेगवेगळी आहे. जर तुम्ही दंड भरला नाहीत तर दंडाची रक्कम कालांतराने वाढत जाते. (हे पाहा: या टपरीवर एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल 1000 रुपये; पाहा काय आहे खास    ) आयटीआर फाईल करताना येतील अडचणी जर तुमच्या नावावर प्रमाणापेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट असतील तर इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग (Income Tax Return File) करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण करदात्याला टॅक्स रिटर्न फाईल करताना सर्व खात्यांचा तपशील द्यावा लागतो. एकापेक्षा अधिक अकाउंट असतील तर कागदोपत्री कार्यवाही करणं अडचणीचं जातं. तुम्ही चुकून जरी एखाद्या खात्याची माहिती देण्याचे विसरलात तर तुम्हाला आयकर विभागाकडून (Income Tax Department) नोटीस पाठवण्यात येते. खातं बंद होण्याचा धोका जर सलग 12 महिन्यांपर्यंत तुम्ही एखाद्या अकाऊंटवरुन कोणत्याही प्रकारे ट्रान्झॅक्शन केली नाही तर बॅंक तुमचे खाते इनॅक्टिव्ह मानले जाते आणि हे खातं डॉर्मंट अकाउंट श्रेणीत समाविष्ट केले जाते. इनॅक्टिव्ह अकाऊंटमधून (Inactive Account) ट्रान्झॅक्शन करण्यास बॅंकेची मनाई नसते. परंतु, डॉर्मंट अकाऊंटवरुन तुम्ही नेट बॅंकींग,एटीएम ट्रान्झॅक्शन किंवा फोन बॅंकींग या सुविधा वापरु शकत नाही. अगदी डेबिट कार्ड, चेक बुक आणि पत्ता बदलण्यासाठी देखील बॅंक तुम्हाला मनाई करु शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात