मराठी बातम्या /बातम्या /देश /शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारने MSP बद्दल घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारने MSP बद्दल घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. 23 प्रकारच्या पिकांचा हमीभाव वाढवण्यात येईल.

शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. 23 प्रकारच्या पिकांचा हमीभाव वाढवण्यात येईल.

शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. 23 प्रकारच्या पिकांचा हमीभाव वाढवण्यात येईल.

दिल्ली, 8 सप्टेंबर : शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी आणि खरिपातील काही पिकांसाठी दरवर्षी हंगाम सुरू होण्याआधी MSP ठरवली जाते. सध्या सरकारने 23 प्रकारच्या पिकांना MSP वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने 2022-23 या हंगामासाठी रब्बी हंगामात मोडणाऱ्या पिकांसाठी MSP वाढवली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गव्हाला 40, चन्याची 130 आणि मोहरीचा सर्वाधिक 400 रुपये ऐवढा भाव वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शेतकरी (Farmer) वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारने MSP मध्ये मोठी वाढ तेव्हा केली आहे जेव्हा काही शेतकरी संघटना दिल्लीत (Kisan Andolan In Delhi) आंदोलन करत आहेत. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइज हा शेतकऱ्यांच्या मालाला एका विशिष्ट ठराविक रकमेत खरेदी केले जाते. त्यामुळे आता तीच रक्कम वाढवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. देशातील गरिब जनतेपर्यंत धान्य पोहचवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून MSP द्वारे काही विशिष्ट रकमेत धान्य खरेदी करते.

भाजपचा मास्टर प्लान, देवेंद्र फडवणीसांवर दिली मोठी जबाबदारी

त्यानंतर हे धान्य रेशन दुकानांपर्यंत पोहचवले जाते. त्यामुळे आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. रब्बी आणि खरिप हंगामातील काही पिकांना सरकारकडून MSP दिली जाते. पण हा दर पिक यायच्या आधी ठरवला जातो. सध्या सरकार शेतकऱ्यांना 23 पिकांना MSP देते. त्यामध्ये काही मुख्य पिकांचाही समावेश आहे. ज्यात प्रामुख्याने तांदुळ, गहू, ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, ऊस, आणि चन्याचा समावेश आहे. त्यामुळे आता या पिकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

First published:

Tags: Farmer, Farmer protest, Narendra modi, PM Kisan