Home /News /mumbai /

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांवर भाजपने दिली मोठी जबाबदारी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांवर भाजपने दिली मोठी जबाबदारी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची भाजपने तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपने बुधवारी पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपले प्रभारी जाहीर केले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची (Upcoming Assembly Elections) भाजपने तयारी करत मास्टर प्लान आखला आहे. यासाठी बुधवारी भाजपने पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. गोवा विधानसभेच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी जाहीर करत विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे. तर जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास उत्तराखंडसाठी भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. सोबतच लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी सिंह यांनाही सहप्रभारी बनवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह हरदीप पुरी, मिनाक्षी लेखी, विनोद चावडा यांच्यावर पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभांसाठी 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. मार्च-एप्रिल 2022 दरम्यान या राज्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Goa

    पुढील बातम्या