मराठी बातम्या /बातम्या /देश /

केंद्रीय मंत्रिमंडळात नारळ दिलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांच्या खांद्यावर लवकरच महत्त्वाची जबाबदारी सोपवणार

केंद्रीय मंत्रिमंडळात नारळ दिलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांच्या खांद्यावर लवकरच महत्त्वाची जबाबदारी सोपवणार

Cabinet Expansion:बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्ताराआधी रविशंकर प्रसाद, (Ravi shankar prasad)डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यासह 12 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री मंडळाचा राजीनामा दिला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 11 जुलै: बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्ताराआधी रविशंकर प्रसाद, (Ravi Shankar Prasad) डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshwardhan) आणि प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यासह 12 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री मंडळाचा राजीनामा दिला होता. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांच्यावर लवकरच पक्षातून महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल. दोघांनाही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. यासह निवडणूक राज्यांच्या प्रभारीचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाऊ शकते.

हेही वाचा- माजी वनमंत्री मंत्रिमंडळात कमबॅक करणार? स्वतः संजय राठोड यांनी दिली प्रतिक्रिया

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेत रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, निशंक आणि हर्षवर्धन यांच्यासह काही नेत्यांचा निवडणूक राज्यांच्या संघटनेची जबाबदारीमध्ये समावेश होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- प्रीतम मुंडेंना डावलल्याचा फटका; बीड ते जालना, नगर पुण्यापर्यंत राजीनाम्याचं लोण 

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी यापूर्वीही भाजपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. निशंक उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील होते तर हर्षवर्धन यांनी दिल्ली भाजपचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

First published:

Tags: BJP, India, Modi government, Prakash javadekar, Sri sri ravi shankar, Union cabinet