जाहिरात
मराठी बातम्या / देश / West Bengal Assembly Election 2021: तिकीट न मागताच दिली उमेदवारी, भाजपाची बंगालमध्ये डबल फजिती!

West Bengal Assembly Election 2021: तिकीट न मागताच दिली उमेदवारी, भाजपाची बंगालमध्ये डबल फजिती!

West Bengal Assembly Election 2021: तिकीट न मागताच दिली उमेदवारी, भाजपाची बंगालमध्ये डबल फजिती!

बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election 2021) दोन उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी (BJP) ने जाहीर केलेली उमेदवारी नाकारुन पक्षाची फजिती केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 19 मार्च : निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवार वाट्टेल ते करायला तयार असतात. बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election 2021) मात्र याच्या उलट घडलं आहे. या निवडणुकीत दोन उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी (BJP) ने जाहीर केलेली उमेदवारी नाकारुन पक्षाची फजिती केली आहे. या प्रकरानंतर तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC MP Mahua Moitra) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना योग्य गृहपाठ (home work) करण्याचा सल्ला दिला आहे. भाजपाने गुरुवारी 157 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी दोघांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. चौरंगी विधानसभा मतदारसंघातून भाजपानं दिवगंत खासदार सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली. त्यांनी आपलं नाव हे मर्जीशिवाय पक्षानं जाहीर केल्याचा दावा केला. ‘मी निवडणूक लढवणार नाही. माझ्या परवानगी शिवाय नावाची घोषणा केली आहे. मी भाजपामध्ये कधीही प्रवेश घेणार नाही. भाजपाच्या यादीत माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये आहे, आणि काँग्रेसलाच साथ देईन,’ असे शिखा मित्रा यांनी स्पष्ट केले. भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी शिखा आणि त्यांच्या मुलाची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. शिखा मित्रा यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या आमदार माला साहा यांचे पती तरुण साहा यांना भाजपाने काशीपूर-बेलगछिया मतदारसंघातून तिकीट दिले होते. त्यांनी देखील उमेदवारी नाकारली आहे. याबाबत आपण भाजपाला कल्पना दिली होती, असे तरुण यांनी स्पष्ट केले. भाजपाकडून अजूनही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (  ‘ममता सरकारचा पराभव पक्का’, मोदींचा दावा! ‘खेला होबे’ घोषणेलाही दिलं उत्तर ) मोईत्रा यांची टीका भाजपाच्या या डबल फजितीमुळे तृणमूल खासदार महुआ मित्रा यांना टीका करण्याची आयती संधी मिळाली. त्यांनी ट्विटरवरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच टोला लगावला आहे. ‘खाकी निकरमध्येही गुडघे दिसतात. भाजपाने 2 आठवड्यानंतर अखेर पश्चिम बंगालमधी उमेदवारांची घोषणा केली. या यादीत ज्यांचं नाव आहे, ते भाजपाचे सदस्य नाहीत. त्यांनी भाजपाकडं तिकीटही मागितले नाही. मिस्टर शहा, तुम्हाला गृहपाठ करण्याची गरज आहे,’ असा टोला मोईत्रा यांनी लगावला आहे. Khaki chaddis in a twist, knees revealed BJP finally announce WB candidates after 2 weeks & those on list say they’re not in the BJP & they are not running on a BJP ticket. Time for some homework, Mr. Shah! — Mahua Moitra (@MahuaMoitra) March 18, 2021 आयारामांना संधी बंगाल निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांवर भर दिला आहे. पक्षाने 20 आयारामांना यंदा संधी दिली आहे. त्यामुळे भाजपातून पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याचा आरोप होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात