मराठी बातम्या /बातम्या /देश /प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन मुलीने स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केलं HIV ग्रस्त बॉयफ्रेंडचं रक्त

प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन मुलीने स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केलं HIV ग्रस्त बॉयफ्रेंडचं रक्त

आपल्याला कुणीही एकमेकांपासून वेगळं करू नये म्हणून अल्पवयीन मुलीने एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त स्वतःच्या शरीरात घेतलं.

आपल्याला कुणीही एकमेकांपासून वेगळं करू नये म्हणून अल्पवयीन मुलीने एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त स्वतःच्या शरीरात घेतलं.

आपल्याला कुणीही एकमेकांपासून वेगळं करू नये म्हणून अल्पवयीन मुलीने एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त स्वतःच्या शरीरात घेतलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Assam, India

गुवाहाटी, 08 ऑगस्ट : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात ते खोटं नव्हे. प्रेमात काही लोक इतका वेडेपणा करतात की ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. सध्या असंच एक प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त इंजेक्शनमार्फत स्वतःच स्वतःच्या शरीरात टोचून घेतलं आहे. आपल्याला कुणीच वेगळं करू नये, यासाठी या मुलीने असं धक्कादायक पाऊल उचललं.

आसामच्या सुआलकुचीमध्ये राहणारी ही मुलगी. अवघ्या 15-16 वर्षांची आहे. फेसबुकमार्फत तिची हाजोच्या सतडोलामध्ये राहणाऱ्या एका मुलाशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू आहे. यादरम्यान मुलीला आपल्या बॉयफ्रेंडला एचआयव्ही असल्याचं समजलं.

हे वाचा - Shocking! वयाच्या पन्नाशीत शारीरिक संबंध ठेवताना तुटला प्रायव्हेट पार्ट; लघवीचाही झाला वांदा

मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत आणि मुलगी ज्याच्यावर प्रेम करते तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे याची माहिती तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. त्यांनी तिला त्याला न भेटण्याची सक्त ताकीद दिली. तरी मुलगी बऱ्याचवेळा बॉयफ्रेंडला भेटली. पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण जितक्या वेळा ती त्याला भेटली तितक्या वेळा तिचे पालक तिला स्वतः जाऊन परत घेऊन आले.

त्यामुळे मुलीने खतरनाक पाऊल उचललं. आपल्या बॉयफ्रेंडला एचआयव्ही असल्याची माहिती होती. त्यामुळे तिने त्याच्या शरीरातून इंजेक्शनमार्फत रक्त काढलं आणि ते आपल्या शरीरात इंजेक्ट केलं. जेणेकरून कोणीच त्या दोघांना वेगळं करू शकणार नाही.

हे वाचा - तु नवऱ्याची झाली नाहीस तर माझी काय होणार, ऐकल्यावर 4 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेल्या प्रेयसीचं भयानक कृत्य

मुलीने जे केलं ते समजताच सर्वजण हादरले. तिच्या कुटुंबाने याची पोलिसांना माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी त्या मुलाला अटक केली आहे. तर मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवलं आहे.

First published:

Tags: Assam, Couple, Relationship