बाली, 04 ऑगस्ट : तुम्हाला लैंगिक समस्यांबाबत माहिती असेल. शारीरिक संबंध ठेवताना होणाऱ्या त्रासाबाबतही माहिती असेल पण कधी शारीरिक संबंध ठेवताना पुरुषाचा प्रायव्हेट पार्टच तुटल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? एका 50 वर्षांच्या व्यक्तीचा बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवताना प्रायव्हेट पार्टच फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर या व्यक्तीला लघवी होणंही बंद झालं.
इंडोनेशियातील ही धक्कादायक घटना इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये पब्लिश करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार 50 वर्षांची ही व्यक्ती प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आली. बायकोसोबत शारीरिक संंबंधावेळी प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं. त्याला रक्तस्रावही होत होता आणि लघवीही करायला जमत नव्हतं.
हे वाचा - बापरे! साधी जखम म्हणून दुर्लक्ष केलं महिलेच्या डोळ्यातून अचानक बाहेर आला कीडा
जावातील डॉ. सोएटोमो जनरल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार झाले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या चारही बाजूच्या उती, रक्तवाहिन्या आणि नसांना हानी पोहोचली होती. त्याला एगप्लँड डिफॉर्मलिटी झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी तात्काळ त्याची सर्जरी केली. पाच दिवस तो रुग्णालयात होता. उपचारानंतर चार महिने त्याला कोणती गंभीर समस्या झाली नाही.
आज तकने डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार 1924 पासून पेनाईल फ्रॅक्चरचे जगात 2000 प्रकरणं समोर आले आहेत. तज्त्रांच्या मते, एकूण प्रकरणांपैकी निम्म्या प्रकरणांमध्ये पेनाईल फ्रॅक्चरवेळी तुटल्याचा आवाजही येतो. बऱ्यादा यानंतर रुग्णाला इरेक्टाइल डिस्फन्क्शची समस्याही उद्भवते.
हे वाचा - Monkeypox Symptoms : प्रायव्हेट पार्टवरही करतोय हल्ला; मंकीपॉक्सची नवी भयंकर लक्षणं समोर
डॉक्टरांच्या मते, पेनाइल फ्रॅक्टर ही असामान्य गोष्ट आहे. पण काही प्रकरणात असं होतं. अशावेळी लवकरात लवकर शक्यतो 24 तासांच्या आत सर्डरी केली तर होणारी गुंतागुंत, उद्भवणारी गंभीर परिस्थिती टाळता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.