जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दारुविक्रीच्या निर्णय़ाविरोधात अजब आंदोलन, दुकानाबाहेर केलं थेट चखण्याचं वाटप

दारुविक्रीच्या निर्णय़ाविरोधात अजब आंदोलन, दुकानाबाहेर केलं थेट चखण्याचं वाटप

दारुविक्रीच्या निर्णय़ाविरोधात अजब आंदोलन, दुकानाबाहेर केलं थेट चखण्याचं वाटप

अहमदनगरच्या जागरूक नागरिक मंचाने दारूच्या दुकानासमोर गर्दी करणाऱ्यांना मोफत चखणा वाटप सुरू केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदनगर, 8 मे : राज्य शासनाने महसूल गोळा करण्याच्या नावाखाली दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात दारूविक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवला जात असून पत्नीला मारहाण, खून, वादावादी अशा घटना घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अनेक दारुड्यांना मद्यसेवन अति झाल्यामुळे दावाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे.  सरकारने ही दारूविक्री बंद करावी या मागणीसाठी आणि दारुविक्रीच्या निर्णयाचा निषेध म्हणून अहमदनगरच्या जागरूक नागरिक मंचाने दारूच्या दुकानासमोर गर्दी करणाऱ्यांना मोफत चखणा वाटप सुरू केले आहे.  गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण जग,  हे जीवन आणि मृत्यूच्या तांडवांमध्ये तणावग्रस्त असे लॉकडाऊन  व सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यावर मात करण्याच्या आशेने कसेबसे पोटाला चिमटा काढून एकेक दिवस मोजत आहे. अनेक सामाजिक संस्थांनी आपला जीव धोक्यात घालून  या कठीण काळात घरोघरी जाऊन  गरीब गरजवंतांना जीवनावश्यक वस्तू , धान्य किराण्याच्या वाटप केले . पण सरकारने दारू दुकाने उघडल्यानंतर यापैकीच अनेक गरीब लाभार्थी दारूच्या रांगेत उभे राहून दारू खरेदी करताना दिसले .  या सर्व भीषण वास्तवाचा निषेध म्हणून जागरूक नागरिक मंचातर्फे आजपर्यंत करत असलेले  जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप थांबवून जी जी दारुची दुकाने उघडी असतील त्याच्या मोफत चखणा वाटण्याचे आंदोलन करुन सरकारचा निषेध  करण्यात आला. ‘बिहार, गुजरात या राज्यात दारूबंदी असताना तिथली राज्य चालू  शकतात. पण कोरोना आपत्तीच्या काळात  दारू दुकाने सुरू करून सामाजिक अंतर आणि कौटुंबिक वातावरण बिघडविण्याचा अघोरी निर्णय सरकारने का घेतला?’ असा सवाल जागरूक नागिरक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी विचारला आहे.  संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात