मराठी बातम्या /बातम्या /देश /

ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी केलेलं कृत्य वाचून हादराल

ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी केलेलं कृत्य वाचून हादराल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: ख्रिसमसच्या दिवशी प्रेयसीला भेटायला जाणं एका अल्पवयीन मुलाला चांगलंच महागात पडलं (minor boy went to meet girlfriend on Christmas) आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 28 डिसेंबर: ख्रिसमसच्या दिवशी प्रेयसीला भेटायला जाणं एका अल्पवयीन मुलाला चांगलंच महागात पडलं (minor boy went to meet girlfriend on Christmas) आहे. गावकऱ्यांनी संबंधित मुलाला आणि त्याच्या प्रेयसीला पकडून थेट त्यांचा विवाह लावून दिल्याचा (villagers caught them and forced them to marry) धक्कादायक प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ (Viral Video) देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित प्रेमीयुगुलाच्या कुटुंबीयांनी देखील गावकऱ्यांच्या या कृत्याचा निषेध केला असून त्यांनी गावकऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना बिहारमधील परशुरामपूर गावातील आहे. येथील एक अल्पवयीन मुलगा ख्रिसमसच्या दिवशी आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या गावात गेला होता. यावेळी गावकऱ्यांनी या अल्पवयीन प्रेमीयुगुलाला मंदिरात घेऊन जात, त्यांचा विवाह लावून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि मुलगी हे एकाच शाळेत शिकत असून एकाच कोचिंग क्लासचे विद्यार्थी आहेत. कोचिंग क्लासमध्येच दोघांची मैत्री झाली होती. यातून पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

महिला सरपंचाचा निर्वस्त्र अवस्थेत जंगलात आढळला मृतदेह,बलात्कार करुन हत्येचा संशय

संबंधित मुलगा क्लास सुटल्यानंतर अनेकदा आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या गावात गेला होता. गावातील काही नागरिकांनी त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं होतं. दोघांनी अशाप्रकारे भेटणं किंवा बोलत बसणं गावकऱ्यांना आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी प्रेयसीला भेटायला आलेल्या मुलाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला गावकऱ्यांनी पकडलं. अनेक ग्रामस्थांनी एकत्र येत दोघांना मंदिरात घेऊन गेले. याठिकाणी गावकऱ्यांनी जबरदस्ती करत त्यांचा विवाह लावून दिला.

जेलमधून सुटताच नराधमाने गाठला विकृतीचा कळस, तरुणीसोबत केलेलं कृत्य वाचून हादराल

दोघंही अल्पवयीन असल्याचा देखील विसर गावकऱ्यांना पडला होता. संबंधित मुलगा हात जोडून गावकऱ्यांना तसं न करण्याची विनवणी करत होता. पण गावकऱ्यांनी आसुरी आनंद मिळत दोघांचा जबरदस्तीने विवाह लावून दिला. ग्रामस्थांच्या कृत्याचा पीडित प्रेमीयुगुलाच्या घरच्यांनी देखील विरोध केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गावकऱ्यांची धरपकड सुरू केली असून अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news