Home /News /pune /

पुण्यात अडकलेल्यांना गावी पाठवण्याची प्रकिया सुरू, 38 जण नांदेडला रवाना

पुण्यात अडकलेल्यांना गावी पाठवण्याची प्रकिया सुरू, 38 जण नांदेडला रवाना

प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

पुणे, 8 मे : लॉकडाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील 38 मजुरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधून आज पुण्यातून स्वगृही पाठवण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. या मजुरांना पाठवण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोव्हिड-19 च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरू असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली. तथापि, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, आज या मजुरांना रवाना करण्यात आले. हेही वाचा - कोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. या 38 प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी श्री. पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले. मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या