नवी दिल्ली, 23 मार्च: गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसने (Coronavirus entry in India) भारतात याच महिन्यात शिरकाव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बरोबर एक वर्षापूर्वी (Janata Curfew 2020) 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू करत या विषाणूने पुढे काय वाढून ठेवलंय याची झलक दाखवली होती. आता वर्षभराने नेमक्या त्याच दिवशी देशात कोरोना रुग्णांची सर्वोच्च (highest peak of coronavirus india) संख्या नोंदली गेली. एका बाजूला लसीकरण (Corona vacccination) सुरू झाल्याचा दिलासा मिळत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर (Covid-19 second wave coronavirus) गाठलं आहे आणि सर्वाधिक धोका महाराष्ट्रातच (Maharashtra corona latest news) आहे. लॉकडाउन लागणार (Lockdown in Maharashtra) का, नवीन निर्बंध काय (New restriction covid-19) असतील याबाबत स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी प्लॅन (MHA Guidelines for effective control of COVID-19) केंद्रीय गृहमंत्रालयाने मांडला आहे आणि त्याबाबत राज्यांना कळवण्यात आलं आहे.
मोदी सरकारने कोरोनाच्या नव्या निर्बंधांविषयी संकेत दिले आहेत. 1 एप्रिलपासून नवे निर्बंध लागू होतील आणि 31 एप्रिलपर्यंत ते असतील, असं या सूचनेमध्ये म्हटलं आहे.
Pune News: पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढताच मोठा निर्णय
गृहमंत्रालयाने (MHA) जारी केलेल्या निवेदनात कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाय योजण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात यावेत, असं म्हटलं आहे. याचा अर्थ आता स्थानिक, जिल्हा, तालुका पातळीवर लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य घेऊ शकतं.
लॉकडाउन होणार का?
महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक दिसून येतो आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती शहरांमध्ये कोरोनाची उच्चांकी संख्या नोंदली गेल्याने गरज पडल्यास लॉकडाउनचा पर्याय विचारात घेऊ असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. आता केंद्रानेही त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. स्थानिक पातळीवर कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेत कंटेन्मेंट झोन ते लॉकडाउनचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.
काय असतील निर्बंध? पुन्हा जिल्हाबंदी?
गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद होती. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रवासाचे निर्बंध नसतील, असं केंद्राने जाहीर केलं आहे. जिल्हाबंदी नसेल, राज्या राज्यांमधली प्रवासी वाहतूकही सुरू राहील, हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही, पण निर्बंध असतील. SOP चे पालन करून व्यवहार सुरू ठेवू शकतील, असं सांगण्यात आलं आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार कोरोना लस
गेल्या वर्षीचा एप्रिल आणि मे महिना किराणा दुकानाच्या बाहेर आखलेले गोल, त्यामध्ये अंतर ठेवून लाग लागलेल्या लांबच लांब रांगा, एका गावातून दुसऱ्या गावात जायचे बंद झालेले मार्ग, रस्त्यांवरचा शुकशुकाट आणि स्मशानशांतता हे अजूनही स्मरणातून गेलेलं नसतानाच पुन्हा एकदा कोरोना विषाणूचं संकट गहिरं झालं आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने या विषाणूशी प्रभावी लढण्यासाठी तीन स्टेप्सचा अॅक्शन प्लॅन दिला आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट (
Test-Track-Treat protocol) अर्थात अधिकाधिक चाचण्या, कोविड पॉझिटिव्ह पेशंट असेल तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आणि उपचार या त्रिसूत्रींच्या साहाय्याने कोरोनावर मात करा, असं या प्लॅनमध्ये सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.