Home /News /national /

आकाशातून पडली रहस्यमयी वस्तू; लोक म्हणाले, 'हा एलियनचा मास्क'

आकाशातून पडली रहस्यमयी वस्तू; लोक म्हणाले, 'हा एलियनचा मास्क'

या वस्तूची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांच्या टीमला बोलवण्यात आलं.

    जयपूर, 21 जून : सध्या सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होतो आहे. धातूसारखी दिसणारी ही वस्तू आकाशातून पडली असून नेटिझन्समध्ये हा एलियन्सचा मास्क असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र ही वस्तू म्हणजे धातूमय उल्का (Metallic Meteorite) असल्याचं सांगितलं जातं आहे.राजस्थानच्या जलोर जिल्ह्यात आज सकाळी आकाशातून एक रहस्यमयी वस्तू पडली. याचं वजन जवळपास 2 किलोंपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. याचा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला. जो पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. हा एलियनचा मास्क असल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वस्तू जेव्हा आकाशातून जमिनीवर पडली तेव्हा जोरदार आवाज आला आणि परिसरात सौम्य झटके जाणवल्याचंही स्थानिकांनी सांगितलं. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. या वस्तूचं वजन सुमारे 2.78 किलो आहे. वस्तू जमिनीतून बाहेर काढली तेव्हा गरम होती. या वस्तूची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांच्या टीमला बोलवण्यात आलं. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा  भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारायला गेला तरुण, काय घडलं पाहा VIDEO जंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप
    First published:

    पुढील बातम्या