मराठी बातम्या /बातम्या /देश /तरुणाच्या पोटात कसा अडकला स्टीलचा ग्लास; 11 डॉक्टरांपुढे उभा राहिला मोठा सवाल

तरुणाच्या पोटात कसा अडकला स्टीलचा ग्लास; 11 डॉक्टरांपुढे उभा राहिला मोठा सवाल

तब्बल 11 डॉक्टरांनी अडीच तास ऑपरेशन केलं आणि...

तब्बल 11 डॉक्टरांनी अडीच तास ऑपरेशन केलं आणि...

तब्बल 11 डॉक्टरांनी अडीच तास ऑपरेशन केलं आणि...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India

पाटणा, 9 ऑक्टोबर : पाटणाच्या पीएमसीएचमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून २४ वर्षीय तरुणाच्या पोटातून मेटल ग्लासला बाहेर काढले आहे. हा ग्लास या तरुणाच्या गुदाशयात अडकला होता. अडीच तास चाललेल्या ऑपरेशननंतर 11 डॉक्टरांच्या पथकाने हा ग्लास बाहेर काढला.

PMCH च्या शस्त्रक्रिया विभागाने शनिवारी शस्त्रक्रिया करून तरुणाच्या गुदाशयातील स्टीलचा ग्लास काढला. रुग्णाचे नाव रितेश कुमार आहे, रुग्णाचे वय 22 वर्षे आहे, तो बेतिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही शस्त्रक्रिया रुग्णालयाचे अधीक्षक आणि शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ IS ठाकूर आणि त्यांच्या 11 सदस्यांच्या टीमने संयुक्तपणे केली आहे. ही शस्त्रक्रिया सुमारे अडीच तास चालली. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या गुदाशयातून सुमारे 7 सेमी व्यासाचा आणि 14 सेमी लांबीचा स्टीलचा ग्लास बाहेर काढला.

तरुणाला पीएमसीएचचे अधीक्षक डॉ. आयएस ठाकूर यांच्या युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान एक्स-रेमध्ये तरुणाच्या गुदद्वारात ग्लास अडकल्याचे आढळून आले. एक्स-रे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे अधीक्षक डॉ.आय.एस.ठाकूर यांनी तातडीने त्यांच्या टीमशी चर्चा करून ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या टीममध्ये सहाय्यक प्राध्यापक डॉ अजय कुमार, सहाय्यक प्राध्यापक डॉ आलोक कुमार, वरिष्ठ निवासी डॉ कुमार वैभव शर्मा, पीजी डॉक्टर डॉ उपासना यांच्यासह 11 डॉक्टरांचा समावेश होता. त्याचवेळी रुग्णाची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याने असे पाऊल उचलल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डॉक्टर आयएस ठाकूर, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणाले की, रुग्णाला सतत पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि रक्तस्त्रावाचा त्रास होत होता. त्यानंतर त्याचे पोट फुगायला लागले आणि त्याला शौचही करता येत नव्हते. हे लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला 3 ऑक्टोबर रोजी पीएमसीएचच्या शस्त्रक्रिया विभागात दाखल केले. ही बाब लक्षात घेऊन आमच्याकडून एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करण्यात आली, त्यानंतर अहवाल आला की गुदाशयाच्या मार्गावर ग्लास अडकला आहे.

हेही वाचा - मुलगी बेपत्ता, 2 वर्षांनी प्रियकराच्या घरातून सापडली भयंकर अवस्थेत; आई-बाबा हादरले!

रुग्णालय व्यवस्थापनाने काल म्हणजेच शनिवारी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती दिली. आता रुग्ण हळूहळू बरा होत आहे. मात्र, त्या प्रसिद्धीत हा ग्लास तरुणांच्या गुदद्वारात कसा अडकला, याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेली नाही.

First published:

Tags: Bihar, Patna