फिरोजाबाद, 9 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन वर्षांपासून गायब असलेल्या प्रेयसीचा मृतदेह हा तिच्याच प्रियकराच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून मुलीचा सांगाडा तिच्या घराच्या आतील जमिनीतून बाहेर काढण्यात आला आहे. प्रियकरानेच दोन वर्षांपूर्वी तिचा खून करून त्याच्याच घरात तिचा मृतदेह पुरला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
हे संपूर्ण प्रकरण सिरसागंज पोलीस स्टेशन हद्दीतील किठौत गावातील आहे. याठिकाणी गौरव आणि खुशबूमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, 20 नोव्हेंबर 2020 रोजी खुशबू अचानक घरातून बेपत्ता झाली होती. यामुळे खुशबूला पळवून नेल्याप्रकरणी कुटुंबीयांनी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस आणि कुटुंबीय दोन वर्षांपासून दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी तिचा प्रियकर गौरव याला पोलिसांनी अटक केली.
पोलीस चौकशीत झाला धक्कादायक खुलासा -
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी प्रियकराने संपूर्ण घटना सांगितली. यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. आरोपी प्रियकराने सांगितले की, तिने सांगितले की, खुशबू लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे 21 नोव्हेंबर 2020 रोजी विष देऊन त्याने तिची हत्या केली आणि नंतर मृतदेह खोलीच्या फरशीखाली पुरून त्यावर सामान ठेवला. तसेच या हत्येनंतर तो कुटुंबासह फरार झाला होता.
हेही वाचा - धक्कादायक! विद्यार्थिंनींचे कपडे बदलताना व्हिडिओ CCTV मध्ये कैद, अशी आली घटना समोर
घटनास्थळावरुन सांगाडा ताब्यात -
या संपूर्ण प्रकरणावर सिरसागंजचे सीओ अवनीश कुमार म्हणाले की, 23 नोव्हेंबर 2020 रोजी मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात त्याचे गौरव नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली. जेव्हा प्रियकर गौरवला अटक केली असता त्याने प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली. तसेच त्याने प्रेयसीची हत्या केल्यावर तिचा मृतदेह आपल्या घरात पुरला होता. यानंतर घटनास्थळावरून आरोपी गौरव आणि त्याचे वडील मुन्ना लाल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder, Uttar pradesh news