मराठी बातम्या /बातम्या /देश /रेल्वे चालवायला ड्रायव्हर सीटवर बसला मानसिक रोगी; वाचा, पुढे काय घडलं?

रेल्वे चालवायला ड्रायव्हर सीटवर बसला मानसिक रोगी; वाचा, पुढे काय घडलं?

रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक

या रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Saharsa, India

मो.सरफराज आलम, प्रतिनिधी

सहरसा, 30 मार्च : कल्पना करा की तुम्ही हजारो प्रवाशांसह रेल्वेमध्ये किंवा फ्लाइटमध्ये बसला आहात. मग अचानक तुम्हाला कळते की, ड्रायव्हरच्या सीटवर बसलेली व्यक्ती ना लोको पायलट आहे ना पायलट. तो सामान्य माणूसही नाही, तर मानसिक रोगी आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? तेही जेव्हा रेल्वे किंवा विमान स्टार्ट पोझिशनमध्ये असेल. तर असाच एक धक्कादायक प्रकार बिहारच्या सहरसा रेल्वे स्थानकावर घडला आहे.

ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस हा लोको पायलट नसून मानसिक रोगी असल्याचे लोकांना समजल्यानंतर याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तो सुद्धा सीटवर शांत बसला नव्हता तर स्टार्ट इंजिनची बटणे वारंवार दाबत होता. नंतर आरपीएफ आणि जीआरपी पोहोचेपर्यंत प्रवासी इंजिनवर चढले आणि जबरदस्तीने त्याला खाली उतरवले. यानंतर रेल्वेचा लोको पायलट आला आणि रेल्वे पूर्णियाकडे रवाना झाली.

रेल्वे सुरू होण्याच्या अर्धा तास आधी घडली घटना -

मिळालेल्या माहितीनुसार, 05224 सहरसा-पूर्णिया जंक्शन पॅसेंजर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक-5 वर उभी होती. दरम्यान, रेल्वे सुटण्याच्या सुमारे अर्धा तास अगोदर एक बिघडलेला व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढला आणि जाऊन लोको पायलटच्या सीटवर जाऊन बसला. यानंतर रेल्वे सुरू करण्यासाठी इकडे-तिकडे बटणे फिरवू लागला.

दरम्यान, प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली. प्रवाशांनीही त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उतरला नाही. मात्र, नंतर काही प्रवासी इंजिनवर चढले आणि जबरदस्तीने खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शेतकऱ्यांसाठी ATM ठरताएत या जातीच्या शेळ्या, होतोय चांगला आर्थिक फायदा VIDEO

एक मानसिक रोगी व्यक्ती लोको पायलटच्या सीटवर बसून राहिली आणि कोणाच्या लक्षातही आले नाही. ना कोणी रेल्वे कर्मचाऱ्याला तर ना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला फलाटावर फिरत असतानाही तो दिसला नाही. अशा परिस्थितीत त्या विचलित व्यक्तीला लोको पायलटच्या सीटवर बसण्यापासून कोणी का रोखले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असेच दुर्लक्ष होत राहिल्यास उद्या मोठी दुर्घटना घडू शकते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Indian railway, Local18, Railway, Railways