नवी दिल्ली, 17 जून: सीबीआयनं (CBI) मेहुल चोक्सीवर (Mehul Choksi) गंभीर आरोप केला आहे. मेहुल चोक्सी आणि त्याची कंपनी गीतांजली जेम्ससह 21 अन्यांविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे. यासंबंधी सीबीआयनं आरोपपत्र (Supplementary Charge sheet)दाखल केलं आहे. या आरोपपत्रात सीबीआयनं दावा केला आहे की, चोक्सीनं देश सोडल्यानंतर एक महिन्यानंतर गीतांजली जेम्सद्वारे दिलेलं निवेदन पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) च्या एका अधिकाऱ्याच्या संगनमतानं गायब करण्याच्या उद्देशानं हटवण्यात आलं होतं.
गेल्या आठवड्यात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, मेहुल चोक्सीला त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती आधीपासून होती. 2017 डिसेंबरमध्ये चोक्सी हाँगकाँगला गेला होता, असा आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे. चोक्सी यांनी आपल्या पुरवठादार संस्थांच्या डमी संचालकांची भेट घेतली होती आणि त्यांना आपल्या गीतांजली समूहाला भारतात असलेल्या समस्यांविषयी सांगितले होते.
हेही वाचा- महाराष्ट्रातल्या राजकारणातील आजची मोठी अपडेट
आरोपपत्रात असे म्हटले आहे की, चोक्सी यांनी त्यांना अंमलबजावणी संचालनालयाद्वारे चौकशीला सामोरे जाण्याची भीतीही व्यक्त केली होती. सीबीआयनं चोक्सीच्या एका कर्मचार्यानं घेतलेल्या जागेत शोध घेतला. त्यानंतर काही अर्ज तसेच कागदपत्रेही जप्त केलीत.
हेही वाचा-'या' राज्यात मोदी- शहा यांना झटका, भाजपमध्ये मोठं खिंडार पडणार?
सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) घोटाळ्याच्या पूरक आरोपपत्रात असा आरोप केला आहे की, मेहुल चोकसी यांच्या मालकीच्या कंपन्यांनी खोटे पत्र उपक्रम आणि परदेशी पतपत्रे दिल्याचा आरोप केला आहे. पीएनबीचा वापर करुन त्यांना 6344.96 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईच्या विशेष न्यायालयात सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात या गोष्टी नमूद केल्या आहेत. एजन्सीने सांगितले की, पीएनबीच्या कर्मचार्यांनी चोक्सीशी हातमिळवणी करून बँकेची फसवणूक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.