Home /News /maharashtra /

राजकारणातील मोठी बातमी, आज संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

राजकारणातील मोठी बातमी, आज संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

आज खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यात बैठक होणार आहे.

    मुंबई, 17 जून: आज खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यात बैठक होणार आहे. मराठा आरक्षणप्रश्नी ((Maratha Reservation)मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा (Varsha bungalow)बंगल्यावर ही बैठक होईल. संध्याकाळी पाज वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक देखील उपस्थित असतील. बुधवारी कोल्हापुरात मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेला मूक आंदोलन पार पडलं. बुधवारी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध पक्षांचे आमदार तसंच खासदार यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन पार पडलं. या मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. या आंदोलनावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी संभाजीराजे छत्रपती तयार असल्यास त्यांची लगेचच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणू, असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या समोर बोलताना दिलं होतं. त्यानंर मूक आंदोलन संपल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राज्यभरातून आलेले मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची त्याच ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत उद्याच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन बैठक करण्याचं निश्नित करण्यात आलं. बैठकीत ठरल्यानुसार आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. या बैठकीत काय चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या