Home /News /national /

सर्वांत मोठी बातमी: 25-30 आमदारासह 2 खासदार BJPला करणार रामराम?

सर्वांत मोठी बातमी: 25-30 आमदारासह 2 खासदार BJPला करणार रामराम?

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)राजकीय वातावरणं चांगलंच ढवळून निघालं आहे. मुकुल रॉय (Mukul Roy)यांच्या टीएमसी (TMC) मध्ये घरवापसी झाल्यानंतर राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत.

    कोलकात्ता, 17 जून: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)राजकीय वातावरणं चांगलंच ढवळून निघालं आहे. मुकुल रॉय (Mukul Roy)यांच्या टीएमसी (TMC) मध्ये घरवापसी झाल्यानंतर राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत. हल्लीच भाजपमधून तृणमूल (Trinamool Congress) काँग्रेसमध्ये परतल्यानंतर मुकुल रॉय आता भाजपमधील आमदारांसोबत संपर्कात असल्याचं समजतंय. पश्चिम बंगालमध्ये आताच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसून येतंय. सोमवारी बंगालमधले भाजप नेते सुवेंद्रु अधिकारी राज्यपाल जगदीप धनखड यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत 77 आमदारांपैकी 51 आमदारच उपस्थित होते. त्यामुळे येत्या काळात भाजपला बंडखोरीला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भाजपमधील अनेक लोकांसोबत माझं बोलणं सुरु असल्याचं मुकुल रॉय यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यातील अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर येतेय. हेही वाचा- महाराष्ट्रातल्या राजकारणातील आजची मोठी अपडेट मुकुल रॉय यांचे सुपूत्र चिरंजीव शुभ्रांशू यांनी यावर सविस्तर सांगितलं. मुकुल रॉय यांच्यासोबत शुभ्रांशू हे देखील पुन्हा टीएमसीमध्ये सामील झाले. भाजपचे जवळपास 25-30 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय भाजपचे 2 खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचं शुभ्रांशू रॉय यांनी सांगितलं. तसंच आपले वडील दबावाखाली असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच माझ्या वडिलांच्या तब्येतीवरुन ते दिसून येतं होतं. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारातही पहिल्यासारखा सहभाग घेतला नव्हता, असंही शुभ्रांशू रॉय म्हणालेत. मुकुल रॉय यांचा बीजापूरमधून निवडणुकीत पराभव झाला होता. काही दिवसांपूर्वीच मुकुल रॉय हे भाजपमधून टीएमसीत दाखल झाले. यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या अनेक नेत्यांशी संपर्कात आहे. मात्र मुकुल रॉय यांचा दावा भाजपनं फेटाळला. पक्षातला कोणताही आमदार आणि खासदार मुकुल रॉय यांच्या वाटेवर जाणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Kolkata, Narendra modi, TMC

    पुढील बातम्या