जाहिरात
मराठी बातम्या / देश / दोन दिवस बेपत्ता झालेली महिला आढळली बँकेच्या स्ट्रॉंगरूममध्ये,चोरी करायला शिरली होती बँकेत

दोन दिवस बेपत्ता झालेली महिला आढळली बँकेच्या स्ट्रॉंगरूममध्ये,चोरी करायला शिरली होती बँकेत

दोन दिवस बेपत्ता झालेली महिला आढळली बँकेच्या स्ट्रॉंगरूममध्ये,चोरी करायला शिरली होती बँकेत

Meghalaya Missing Woman: दोन दिवसांपासून बेपत्ता (Missing)झालेल्या महिलेचा (Woman)शोध लागला आहे.

मेघालय, 30 जून: दोन दिवसांपासून बेपत्ता (Missing) असलेल्या एका महिलेचा (Woman) सर्वत्र शोध सुरू असताना ती एका बँकेच्या स्ट्रॉंगरूममध्ये (Bank Strongroom) सापडली आहे. मेघालयमध्ये (Meghalaya) ही अजब घटना घडली असून, इसाबेला मारबोह (Isabela Marboh) असं या महिलेचं नाव आहे. ही चाळीस वर्षीय महिला शुक्रवारी चोरीच्या उद्देशानं बँकेत शिरली होत. पण बँकेला शनिवार, रविवार सुट्टी असल्यानं ती आतच अडकली. अखेर सोमवारी बँक उघडल्यावर ती सापडली. तोपर्यंत तहानभुकेनं तिची अवस्था वाईट झाली होती. टीव्ही 9 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी इसाबेलाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं. तिचा कोविड रिपोर्ट (Covid Report) अपेक्षित असून, सध्या तिला शिलाँग यूथ सेंटरमधील (Shillong Youth Centre) क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आलं आहे.तिच्याविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत, असं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाबेला मारबोह शुक्रवारी संध्याकाळी चोरीच्या उद्देशानं घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या बँकेत गेली. बँकेत शिरल्यानंतर सर्व्हर रूममध्ये (Server room) लपून रहायचं आणि बँक बंद झाल्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये शिरून पैसे चोरायचे आणि दुसऱ्या दिवशी बँक उघडली की बाहेर पडायचं अशी तिची योजना होती. आपलं काम करण्यासाठी तिनं काही हत्यारंही सोबत घेतली होती. तसंच रात्रभर खाण्यासाठी तिनं चॉकलेट आणि ओआरएस (ORS) घेतलं होतं. हेही वाचा-  जन्मदात्या बापाकडूनच तीन मुलांच्या हत्येचा प्रयत्न, आईस्क्रिममधून दिलं विष त्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी घरात भाजी खरेदी करायला जाते असं सांगून ती पैसे जमा करण्याच्या बहाण्यानं बँकेत गेली. नंतर कुणाचे लक्ष नाही असं पाहून हळूच सर्व्हर रूममध्ये शिरून लपून बसली. बँक बंद झाल्यानंतर ती थेट स्ट्रॉंग रूममध्ये गेली. परंतु तिच्याकडे स्ट्रॉंग रूमचे लॉकर तोडण्यासाठी आवश्यक ती साधनं नव्हती. कात्रीच्या सहाय्यानं तिनं ते उघडण्याचा प्रयत्न केला. पण तिला यश आलं नाही. सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग झालं असेल या भीतीनं तिनं सीसीटीव्हीही (CCTV) फोडला. दुसर्‍या दिवशी सकाळी बँक उघडल्यावर बाहेर पडण्याचं तिनं ठरवलं. पण इथंच दुर्दैव आड आलं. दुसर्‍या दिवशी महिन्याचा चौथा शनिवार असल्यानं बँकेला सुट्टी होती. त्यानंतर रविवार होता. त्यामुळं इसाबेला तीन रात्री बँकेतच अडकून पडली. तिनं नेलेली काही चॉकलेट्स आणि ओआरएस पहिल्याच दिवशी संपून गेलं होतं. त्यामुळं पुढचे दोन्ही दिवस तिला अन्नपाण्याविना काढावे लागले. त्यामुळं सोमवारी सापडेपर्यंत तिची अवस्था अतिशय वाईट झाली होती. सोमवारी बँक उघडली तेव्हा इसाबेला तिथं आढळून आली. त्यावेळी बँकेच्या मॅनेजरने इसाबेलाच्या नवऱ्याला आणि पोलिसांना फोन केला. हेही वाचा-  दहिसरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या दरम्यान, दोन दिवस बेपत्ता असलेल्या इसाबेलाचा शोध घेण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर अपील केलं होतं. ईस्ट मोजो या न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, बिष्णुपुरमधील पब्लिक एड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून तिला शोधण्यासाठी मदत करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. अखेर ती सापडली; पण अत्यंत विचित्र परिस्थितीत. त्यामुळं या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात