• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार, गोळ्या घालून मालकाची हत्या

दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार, गोळ्या घालून मालकाची हत्या

Dahisar Crime: दहिसरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. दिवसा ढवळ्या तीन जणांनी गोळी झाडून ज्वेलर्स (Jewelers) मालकाची हत्या केली आहे.

  • Share this:
मुंबई, 30 जून: दहिसरमध्ये (Dahisar) गोळीबाराची घटना घडली आहे. दिवसा ढवळ्या तीन जणांनी गोळी झाडून ज्वेलर्स (Jewelers) मालकाची हत्या केली आहे. दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. (Jewelers owner shot dead in Dahisar) ओम साईराज ज्वेलर्स असं या ज्वेलर्स दुकानाचे नाव आहे. तीन अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स शिरले आणि त्यांनी दुकानात लूट केली. यावेळेस ज्वेलर्स मालकानं त्याला विरोध केला असता त्याच्यावर लुटारुंनी गोळी झाडली. यात मालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा-  राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती दहिसर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून मुंबई पोलिसांचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार झालेत. मुंबई पोलिसांनी सर्व मुंबई एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहे.
Published by:Pooja Vichare
First published: