Home /News /national /

एकतर्फी प्रेमातून सात जणांचा जीव घेणाऱ्या माथेफिरूला अटक; कांड जाणून हादराल

एकतर्फी प्रेमातून सात जणांचा जीव घेणाऱ्या माथेफिरूला अटक; कांड जाणून हादराल

मध्यप्रदेशातील इंदूर (Indore) येथे एका अग्निकांडातील 7 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपीला अटक (Accused) करण्यात आली आहे. संजय उर्फ शुभम दीक्षित असे त्याचे नाव आहे. तो झांसी येथील रहिवासी आहे.

  इंदूर, 8 मे : मध्यप्रदेशातील इंदूर (Indore) येथे एका अग्निकांडातील 7 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपीला अटक (Accused) करण्यात आली आहे. संजय उर्फ शुभम दीक्षित असे त्याचे नाव आहे. तो झांसी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात आरोपीची ओळख पटली.
  काय आहे नेमके प्रकरण? इंदूरच्या स्वर्ण प्रभा कॉलनीत लागलेल्या आगीच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजत होते. मात्र, पुरावे गोळा करून सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे. आरोपी संजयने इमारतीच्या खाली तळघरात उभ्या असलेल्या स्कूटीला आग लावली होती. यानंतर या आगीने भीषण रुप धारण करुन संपूर्ण इमारतीला आपल्या कवेत घेतले. याच घरात तो सहा महिन्याआधी भाड्याने राहात होता. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या रात्रीही संजय मुलीला भेटायला आला होता. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर रागाच्या भरात तरुणाने आपल्या मैत्रिणीची स्कूटी पेटवून पळ काढला. पण, आगीने भीषण रूप धारण केले आणि इमारतीत झोपलेल्या 7 जणांचा जीव घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात आरोपीची ओळख पटली असून आरोपी संजय उर्फ शुभम दीक्षितला अटक करण्यात आली आहे. तसेच विजय नगर पोलीस ठाण्यात इमारतीचा मालक इन्साफ पटेल याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इमारतीत सुरक्षेच्या विहित दर्जाची संसाधने नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे निष्काळजीपणा आढळून आल्यावर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. हेही वाचा - आंतरजातीय विवाहानंतर घरच्यांनी फरफटत माहेरी नेलं; पतीच्या हाकेनंतर मदतीसाठी धावून आले पोलीस
   इंदूरचे आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नगर भागात लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला होता. यामुळे चौकशीअंती ही आग लागली नसून कट रचून लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना सीसीटीव्हीही फुटेजही मिळाले, ज्यामध्ये आरोपी आग लावताना दिसत आहे. संजय उर्फ ​​शुभम दीक्षित अशी आरोपीची ओळख पटली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Indore News, Love at first sight, Police

  पुढील बातम्या