Home /News /maharashtra /

आंतरजातीय विवाहानंतर घरच्यांनी फरफटत माहेरी नेलं; पतीच्या हाकेनंतर मदतीसाठी धावून आले पोलीस

आंतरजातीय विवाहानंतर घरच्यांनी फरफटत माहेरी नेलं; पतीच्या हाकेनंतर मदतीसाठी धावून आले पोलीस

अमरावतीत (Amravati) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीनं आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) केल्यानं चिडलेल्या आईवडिलांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण केलीय.

    अमरावती, 08 मे: अमरावतीत (Amravati) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीनं आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) केल्यानं चिडलेल्या आईवडिलांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण केलीय. इतक्यावरच हे आई वडील थांबले नसून बिहार स्टाईलनं तिला फरपटत नेल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या (Amravati District) अंबाडा (Ambada village) या गावात घडली आहे. या प्रकरणी आता पतीनं मोर्शी पोलिसांत (Morshi police) तक्रार दिली आहे. काय घडली नेमकी घटना सावरखेड येथील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील प्रतिक तडस या तरुणासोबत प्रेम संबंध होते. या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येथे आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. त्यानंतर मुलगी 4 मे रोजी घरून मुलाकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर मुलीच्या माहेरकडचे दहा ते बारा नातेवाईक अंबाडा येथे पोहोचले आणि त्यांनी मुलीला फरपटत, मारहाण करत बिहार स्टाईल उचलून नेलं. पतीनं आपल्या पत्नीला मारहाण करून अपहरण केल्याची मोर्शी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन विवाहित महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आणि मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर काल रात्री उशिरा मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. काय आहे नेमकी घटना 22 वर्षीय तरुण आणि 19 वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 28 एप्रिलला या दोघांनी अमरावती शहरातील आर्य समाज मंदिरात लग्न केलं. तसं लग्नाचं प्रमाणपत्रसुद्धा तरुणाकडे आहे. लग्नानंतर मुलगी तिच्या पतीकडे अंबाडा येथे राहत होती. 4 मे रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या माहेरकडचे अंबाड्यात त्या तरुणाच्या घरी पोहोचले. त्यांनी तिला सोबत आपल्या घरी येण्यासाठी आग्रह केला. मात्र मुलगी त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती. मुलीनं त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानं माहेरच्या लोकांनी अक्षरश: तिला मुलाच्या घरातून फरफटत नेलं. याप्रकरानंतर पतीने तत्काळ या प्रकरणाची माहिती मोर्शी पोलिसांना दिली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Amravati

    पुढील बातम्या