Home /News /crime /

डायपरमध्ये लपवले ड्रग्स; थर्टी फस्ट पार्टीच्या तयारीत असलेली मुंबईतील एअर होस्टेस अटकेत

डायपरमध्ये लपवले ड्रग्स; थर्टी फस्ट पार्टीच्या तयारीत असलेली मुंबईतील एअर होस्टेस अटकेत

चौकशीदरम्यान तरुणीने मुंबई आणि इंदूरमधील अनेक तस्कऱ्यांची नावं सांगितली.

    इंदूर, 19 डिसेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूर क्राइम ब्रान्चने मुंबईतील (Mumbai) एका तरुणीला 100 ग्रॅम एमडीएमए (ड्रग्स) सह अटक (Crime News) केली आहे. ही तरुणी 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तस्करांना मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आली होती. पोलिसांनी यातील तब्बल 10 लाख रुपयांचे 100 ग्रॅम एमडीएमए जप्त केलं आहे. तरुणी मुलांच्या डायपरमधून ड्रग्स लपवून आणत होती. पोलिसांनी चार दिवसांपूर्वी नार्को हेल्पलाइन नंबर 7049108383 जारी केलं होतं. पोलिसांना यानंबरवरुन सूचना मिळाली होती. त्यामुळे पोलीस या संशयितांवर लक्ष ठेवून होती. दोन दिवसांपूर्वी क्राइम ब्रान्चच्या टीमने ग्राहक बनून तस्करांशी संपर्क केला आणि तरुणी मुंबईहून इंदूरला येत असताना तिला अटक केली. तरुणीने आपलं नाव मानसी असल्याचं सांगितलं आहे. तिने सांगितलं की, ती एअऱ होस्टेस होती. ती सुरुवातील आंतरराष्ट्रीय हवाई सेवेत काम करीत होती. मात्र काही वर्षांनी तिने हे काम सोडून दिलं. हे ही वाचा-खळबळजनक! जालन्यात 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, तीक्ष्ण हत्याराने घातले घाव पोलिसांनी सांगितलं की, तरुणीजवळ नेपाळ आणि बहरीनचे चलन मिळाले आहेत. ती डार्क नेटशी जोडलेली होती. चौकशीदरम्यान तरुणीने मुंबई आणि इंदूरमधील अनेक तस्कऱ्यांची नावं सांगितली. सागर गँगशी जोडलेली आहे तरुणी.. क्राइम ब्रान्चचे अॅडिशनल डीजीपी गुरुप्रसाद पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी ही तरुणी देह व्यापार, मानवी तस्करीतील आरोपी सागर जैन उर्फ सँडोच्या टोळीशी संबंधित आहे. ती हाय प्रोफाइल पार्टीमध्ये ड्रग सप्लाय करते. तिने अन्य तस्कऱ्यांची नावांचाही खुलासा केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Drugs, Madhya pradesh, Mumbai

    पुढील बातम्या