मराठी बातम्या /बातम्या /देश /Lockdown मध्ये नियम धुडकावून झालेली लग्न ठरणार बेकायदेशीर; मोठा निर्णय

Lockdown मध्ये नियम धुडकावून झालेली लग्न ठरणार बेकायदेशीर; मोठा निर्णय

अनेक ठिकाणी Corona Lodkdown चे नियम धुडकावून मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊन विवाह समारंभ (Marriages during lock-down) साजरे करत असल्याचं दिसत आहे. त्यावर चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी Corona Lodkdown चे नियम धुडकावून मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊन विवाह समारंभ (Marriages during lock-down) साजरे करत असल्याचं दिसत आहे. त्यावर चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी Corona Lodkdown चे नियम धुडकावून मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊन विवाह समारंभ (Marriages during lock-down) साजरे करत असल्याचं दिसत आहे. त्यावर चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    उज्जैन, 27 मे: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवलेला (Covid-19 second wave) असताना हा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात बहुतांश ठिकाणी लॉकडाउन (corona Lockdown) लागू करण्यात आला आहे. तरीही अनेक ठिकाणी नियम धुडकावून मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊन विवाह समारंभ (Marriages during lock-down) साजरे करत असल्याचं दिसत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नियम डावलून केलेलं लग्न आता बेकायदेशीर ठरवण्याचाच निर्णय मध्य प्रदेशात घेण्यात आला आहे.

    मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) तर लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करून अनेक विवाह समारंभ साजरे झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळं असे विवाह समारंभ साजरे करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेले विवाह बेकायदेशीर (illegal marriage) घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या जोडप्यांना लग्नाचे दाखलेही (Marriage Certificate) दिले जाणार नाहीत.

    मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या नेतृत्वाखालील शासनानं मे महिन्यात विवाह सोहळ्यांवर बंदी घातली होती. तरीही लोकांनी नियम धुडकावून लावत विवाह समारंभ साजरे केले. 30 दिवसांपेक्षाही कमी कालावधीत किमान 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गृह विभागाच्या अधिकाऱ्यानं माध्यमांना दिली आहे.

    कोरोना लसीकरणाबाबत प्रत्येक आरोपांचं खंडन; केंद्राने दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

    लग्नाला बंदी असतानाच्या काळात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लग्नाचे प्रमाणपत्र न देण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यानी विवाह निबंधक कार्यालयांना दिले आहेत. अन्यथा कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. भारतीय दंड संहिते (आयपीसी) अंतर्गत सार्वजनिक कर्मचार्‍यांकडून बजावल्या गेलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्यास या अधिकाऱ्यांवर देखील कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असंही जिल्हा दंडाधिकाऱ्यानी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

    लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून किमान 130 विवाह समारंभ गुप्तपणे आयोजित करण्यात आल्याचं आढळलं आहे.

    लॉकडाऊनबाबत टास्क फोर्सचा सल्ला घेऊन मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

    शिक्षेची कोणतीही तरतूद नसल्यानं मोठ्या प्रमाणात गुप्तपणे विवाहसोहळे साजरे करण्यात आले असल्याचं उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिषसिंग यांनी माध्यमांना सांगितलं. ‘याबाबत शिक्षेची कोणतीही तरतूद नसल्यानं लोक बिनधास्त गुप्तपणे विवाह सोहळे साजरे करत आहेत. आता असे गुप्तपणे केलेले सर्व विवाह बेकायदेशीर घोषित केले जातील आणि या जोडप्यांसह त्यांचे कुटुंबीय आणि लग्न लावणाऱ्या भटजींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असं आशिष सिंग यांनी स्पष्ट केलं.

    ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी के. व्ही. सिंग यांनी सांगितले की, डाबरा गावातील 20 टक्के गावकरी एका लग्न समारंभात लग्नात संसर्गग्रस्त झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘लोकांना त्रास देण्यासाठी नव्हे तर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचं आढळल्यानं राज्य शासनानं विविध जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाशी सल्लामसलत केल्यानंतर जिल्हा आपत्ती समितीनं झाबुआ, अलिराजपूर, बुरहानपूर, भिंड आणि खांडवा या पाच जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

    या ठिकाणांहून मिळणाऱ्या अभिप्रायाच्या आधारावर एक जूननंतर राज्यातील इतर जिल्ह्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 ला दिली. शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं 18 मे रोजी वेगवेगळ्या कालावधीसाठी राज्यातील सर्व 52 जिल्ह्यांमधील ‘कोरोना कर्फ्यू’ची मुदत (Corona Curfew) वाढवली होती. इंदूर औद्योगिक केंद्रात 29 मेच्या रात्रीपर्यंत कोरोना कर्फ्यू लागू आहे.

    First published:
    top videos

      Tags: Coronavirus, Lockdown, Madhya pradesh, Mar