मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Lockdown: लॉकडाऊन पूर्ण उठवला जाणार नाही, तो वाढेल पण शिथिलता दिली जाणार

Maharashtra Lockdown: लॉकडाऊन पूर्ण उठवला जाणार नाही, तो वाढेल पण शिथिलता दिली जाणार

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

Maharashtra Lockdown relaxations: राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी घसरण आणि रिकव्हरी रेटमध्ये होत असलेली वाढ पाहता राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 27 मे: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध लागू राहणार की नाही याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे तसेच लॉकडाऊन शिथिल करण्याच्या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

ज्या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट आहे त्या ठिकाणी साहजिकच रुग्णवाढ सुद्धा कायम आहे. त्यामुळे सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे तो कायम राहणार आणि त्यात शिथिलता देण्यात येईल. मग ती शिथिलता कशा प्रकारची असेल त्यावर टास्क फोर्स सोबत चर्चा करुन दोन दिवसांत निश्चित करण्यात येतील असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

अखेर राज्य सरकारचं एक पाऊल मागे, उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द

मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, मंत्रिमंडळ बैठकीत म्युकरमायकोसिसच्या विषयावरही चर्चा झाली. सर्वच जिल्ह्यांत अद्याप कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण झालेली नाहीये. लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. टास्क फोर्ससोबत बोलून मुख्यमंत्री निर्णय घेतील. लॉकडाऊनचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाहीये.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा 31 मे 2021 पर्यंत पुन्हा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra