Home /News /national /

कॅन्सरग्रस्त रम्याला वाचविण्यासाठी मराठी IPS अधिकाऱ्याची धडपड, बनवलं एक दिवसं आयुक्त, पण...

कॅन्सरग्रस्त रम्याला वाचविण्यासाठी मराठी IPS अधिकाऱ्याची धडपड, बनवलं एक दिवसं आयुक्त, पण...

'हे जिवन किती क्षणभंगुर आहे आणि वैद्यकीय शास्त्र आजही ब्लड कॅन्सर वर मात करू शकले नाही याचा प्रत्यय आला. आमच्या वतीने होईल तेव्हढे प्रयत्न केले.'

    हैदराबाद 12 जून:  रम्या या हैद्राबाद च्या 18 वर्षाच्या मुलीवर शेवटी कॅन्सर च्या आजाराने झडप घातली. काही वर्ष सुरू असलेला तिचा संघर्ष संपला. या मुलीला वाचविण्यासाठी तेलंगणातले असलेले ज्येष्ठ मराठी IPS अधिकारी महेश भागवत यांनी खूप प्रयत्न केले. या मुलीची पोलीस आयुक्त बनण्याची इच्छा होती. त्यांनी तिला एक दिवसाचं पोलीस आयुक्तही बनवलं होतं. रम्याला चांगले औषधोपचार मिळावेत यासाठीही महेश भागवतांनी नियमांच्या पलिकडे जात माणुसकीच्या नात्याने खूप प्रयत्न केले. पण रम्या काही वाचू शकली नाही. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात अतिशय कर्तव्यदक्ष आणि सचोटीचे अधिकारी अशी ओळख असलेले महेश भागवत हे  सध्या तेलंगणातल्या राचकोंडा इथं पोलीस आयुक्त आहे. त्यांनी रम्याच्या मृत्यूनंतर आपल्या भावना अतिशय संवेदनशीलपणे व्यक्त केल्या आहे. तिच्या संघर्षाची कहाणीच त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. ते म्हणतात, 30 ऑक्टोबर 2019 रोजी मेक ए विश फाउंडेशनने राचकोंडा पोलिसांना 17 वर्षाच्या कॅन्सरच्या दुर्धर आजाराला तोंड देत वाटचाल करणाऱ्या रम्या नावाच्या मुलीला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याची इच्छा असल्याचे कळविले. तिच्या विनंती ला मान देत आम्ही रितसर तिला पोलीस आयुक्त खुर्चीवर बसवले. पत्रकार परिषदेत महिलांच्या प्रश्नासाठी मी प्रयत्न करेन असे तिने प्रामाणिक उत्तर दिले होते. त्यावेळी निजाम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे तिच्यावर उपचार चालू होते आणि ती त्यातून बाहेर आलीही. एका कॉल सेंटरमध्ये ती नोकरी करू लागली. 12वीची परीक्षा पुढच्या वर्षी देण्याचा निर्णय वैद्यकीय सल्यानुसार तिने घेतला. धोका वाढला: मुंबईत सोसायटीने तयार केले ICU बेड्स, तर दिल्लीत ऑक्सिजन मशिन्स मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक मोठा कार्यक्रम घेतला त्यात राज्याच्या गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी रम्याचा मोठा सत्कार ही केला. पण मे महिन्यात तिची प्रकृती अचानक खालावली. मला मोबाईल वर तिचा मेसेज आला की तिला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन देण्यास मना केली आहे आणि आणखी फार काही करता येणार नाही असेही सांगितले कारण प्लेटलेट्स संख्या 20000 पेक्षा कमी होती. स्थानिक पोलीस आणि डॉक्टराशी बोलून आम्ही तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नायक नाही ही नायिका! 14 वर्षीय हिना झाली एक दिवसासाठी Sub Divisional Megistrate इंडियन रेड क्रॉस संस्थेला आम्ही 1000 पेक्ष्या जास्त रक्तदाते मिळवून दिल्याने त्याच्या मार्फत त्वरित प्लेटलेट्सची व्यवस्था झाली. आर्थिक मदत ही आम्ही केली.  दर 3 ते 4 दिवसांनी NIMS आणि MNJ निलोफर या हॉस्पिटलमध्ये रम्या प्लेटलेट्साठी जाऊ लागली पण काल अचानक तिच्या निधनाची बातमी तिच्या मामांनी कळवल्यावर माझ्या पायाखालची वाळू सरकली. हे जिवन किती क्षणभंगुर आहे आणि वैद्यकीय शास्त्र आजही ब्लड कॅन्सर वर मात करू शकले नाही याचा प्रत्यय आला. आमच्या वतीने होईल तेव्हढे प्रयत्न करत 40 दिवस तिच्या मृत्यूला दूर ठेवण्यासाठी आपले हातभार लागले एव्हढेच मात्र समाधान. रम्या तुझ्या जिद्दीला सलाम. संपादन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या