जाहिरात
मराठी बातम्या / देश / नायक नाही ही तर नायिका! 14 वर्षीय हिना झाली एक दिवसासाठी Sub Divisional Megistrate

नायक नाही ही तर नायिका! 14 वर्षीय हिना झाली एक दिवसासाठी Sub Divisional Megistrate

नायक नाही ही तर नायिका! 14 वर्षीय हिना झाली एक दिवसासाठी Sub Divisional Megistrate

हिनाचे वडील शिपाईचं काम करतात. ती दहावीत मेरिटमध्ये आली आहे. मोठं झाल्यावर तिला IAS अधिकारी व्हायचं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, १२ जून : 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये नायक नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात पत्रकाराला एका दिवसासाठी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तो रील लाइफचा एक सीन होता, परंतु कांगडामध्ये ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. खरं तर कांगडाचे एसडीएम जतिन लाल यांनी अनोख्या पद्धतीने आपल्याच कार्यालयीतल शिपाईच्या मुलीचं कौतुक केलं आहे. दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवलेल्या आपल्या कार्यालयातील शिपाईच्या मुलीला एक दिवसासाठी एसडीएमची जबाबदारी दिली आहे. या मुलीने मेरिटमध्ये 34 वा क्रमांक मिळविला आहे. 14 वर्षाची हिना ठाकूर सकाळी 11 वाजल्यापासून एसडीएम कांगडाच्या खुर्चीवर बसून दिवसभराची कामे समजून घेत होती. हिनासमवेत एसडीएम जतिन उपस्थित होते व तिला मार्गदर्शन करीत होते. हिनाने एसडीएमच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन बैठका घेतल्या. तसेच ज्या लोकांच्या समस्या आहेत त्यांनी एसडीएमच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे निराकरण केले. हिना ठाकूर म्हणाली की, हे तिच्यासाठी स्वप्नासारखे आहे आणि ती खूप आनंदी आहे. एसडीएम सरांनी मला स्वप्न दाखवलं आहे आणि मी ते नक्की पूर्ण करीन. हिना म्हणाली की, लहानपणापासूनच तिला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. हिना गुरुदत एंग्लो वैदिक शाळेत शिकते. ती मूळ शिमला जिल्ह्यातील आहे. वडील इथे काम करत असल्याने कुटुंबीय येथे भाड्याच्या घरात राहतात. काय म्हणाले एसडीएम एसडीएम जतिन लाल यांनी सांगितले की, ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितले की शिपायाच्या मुलीने दहावीत 94 टक्के गुण मिळवले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही या मुलीने मेहनत करुन इतके चांगले गुण मिळविल्याने तिचा सन्मान करावा असं वाटलं. जेव्हा मुलीला तिच्या सन्मानार्थ कार्यालयात बोलावले गेले आणि तिने सांगितले की तिला आयएएस व्हायचे आहे. मग मी विचार केला की हिनाला एक दिवस एसडीएम बनवावे. मुली या मुलांपेक्षा कमी नाही. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असा विचार करून एक दिवस हिनाला एसडीएम केलं. हे वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचा जीएसटीबाबत मोठा निर्णय संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात