Home /News /mumbai /

धोका वाढला: मुंबईत सोसायटीने तयार केले ICU बेड्स, तर दिल्लीत घेतली ऑक्सिजन मशिन्स

धोका वाढला: मुंबईत सोसायटीने तयार केले ICU बेड्स, तर दिल्लीत घेतली ऑक्सिजन मशिन्स

दिल्लीत खासगी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन मशिन्स (oxygen concentrators) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई 12 जून: देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात सगळ्यात मोठा वाटा हा मुंबई आणि दिल्ली या दोन राजधानीच्या शहरांचा आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये हा कोरोना रुग्णांचा संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून मुंबई आणि दिल्लीतल्या बड्या सोसायट्यांनी आता पुढाकार घेत आपल्याच परिसरात आरोग्य सुविधा उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या पर्ल या बड्या सोसाटीमध्ये तब्बल 650 फ्लॅल्ट्स आहेत. तिथे 3 हजारांच्या आसपास लोक राहतात. त्यामुळे भविष्यातला धोका ओळखून या सोसायटीने आपल्याच परिसरात Quarantine Unit आणि ICU Unit उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोसाटीचा क्लब हाऊस आणि रिकामे फ्लॅट्स यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोसायटीचेच सदस्य असलेले डॉ. निलेश शाह यांनी दिली. भविष्यात पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार असल्याने जागा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोसायटीनेच हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यासाठी पालिकेचीही परवानगी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तज्ज्ञांनी दिला इशारा! Coronavirus च्या साथीचा विस्फोट जुलै किंवा ऑगस्टमध्ये तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत खासगी हाऊसिंग सोसायट्यांनी ऑक्सिजन मशिन्स (oxygen concentrators) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गरजुंना आणीबाणीच्या काळात तातडीने मदत मिळावी म्हणून या मशिन्सचा उपयोग करण्यात येणार असल्याचं सोसायटीने सांगितलं आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सातव्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 357 जणांचा मृत्यू झाला. याआधी 6 जून रोजी सगळ्यात जास्त 298 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. या आठवड्यात दररोज 9000 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांचा आकडाही 8 हजार पार गेला आहे. या मोठ्या राज्यात लपवले 200 कोरोना रुग्णांचे मृत्यू, माहिती उघड झाल्याने खळबळ! आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे आता 1 लाख 37 हजार 448 अॅक्टिव्ह प्रकरणं आहेत. तर, 8 हजार 102 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 41 हजार 28 लोकं निरोगीही झाले आहे. सलग दुसऱ्यांदा अॅक्टिव्ह केसेस पेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. भारताचा रिकव्हरी रेट 49.2% झाला आहे. संकलन - अजय कौटिकवार
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या