Home /News /national /

परदेशात शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा डोंगर; कोविडमुळे अनेकांचं भवितव्य टांगणीला

परदेशात शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा डोंगर; कोविडमुळे अनेकांचं भवितव्य टांगणीला

करियर ही अनेक वर्षांच्या मेहनतीने घडणारी गोष्ट आहे. एक किंवा दोन वर्षांमुळे त्यावर परिणाम होऊ देऊ नका. उलट मिळालेला वेळ काहीतरी नवीन शिकण्यात घालवा.

करियर ही अनेक वर्षांच्या मेहनतीने घडणारी गोष्ट आहे. एक किंवा दोन वर्षांमुळे त्यावर परिणाम होऊ देऊ नका. उलट मिळालेला वेळ काहीतरी नवीन शिकण्यात घालवा.

कोरोना साथीमुळे देशातील शिक्षण व्यवस्था कोलमडून गेली आहे. अशात शिक्षणासाठी भारताबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. त्यांना व्हिसा मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत.

    मुंबई, 07 मे : कोरोना विषाणूच्या साथीनं समाजाच्या विविध घटकांवर अत्यंत वाईट परिणाम केला आहे. यामुळे देशातील शिक्षण व्यवस्था तर कोलमडून गेलीच आहे. पण शिक्षणासाठी भारताबाहेर जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. अशात अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे तर अनिश्चितेचं भयानक वातावरण निर्माण झालं आहे. भारतातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. तर महाराष्ट्रातील बिघडती कोरोना स्थिती लक्षात घेता, मुंबईतील अमेरिकन दूतावासानं आपल्या कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. अशातच काही विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी दिल्लीला येण्यास सांगितलं आहे. पण त्याठिकाणीही खरंच व्हिसासाठी मुलाखत घेतली जाईल का? याबाबत काहीच निश्चितता नाही. सध्या दिल्लीतही कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत व्हिसाच्या मुलाखतीसाठी दिल्ली याठिकाणी जाणं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत घातक ठरत आहे. असं असतानाही पुण्यातील काही विद्यार्थी कोरोना विषाणूच्या मध्यावर जोखीम पत्करून दिल्लीला जाण्यासाठी तयार आहेत. हे वाचा - लाचखोर पोलिसाशी झालेल्या भांडणामुळं बदललं आयुष्य, IPS मग IAS बनल्या गरिमा सिंह महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईतील अमेरिकन दूतावासानं सर्व अपाँइंटमेंट रद्द केली आहेत. तर दिल्लीतील अमेरिकन दुतावासानंही असंख्य विद्यार्थ्यांच्या अपाँइंटमेंट्स पुढे ढकलल्या आहेत. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांनी परदेशातील नामी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे. पण व्हिसा मिळत नसल्यानं त्यांना संबंधित देशात जाता येत नाही. त्यामुळे प्रवेश काढून घेण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्याचं त्यांच स्वप्न हवेतच विरत आहे. हे वाचा - स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभवचा Covid ने घेतला बळी एका 23 वर्षीय विद्यार्थ्यानं पुणे मिररला सांगितलं की, "सध्याच्या घडीला खूप मोठा संभ्रम तयार झाला आहे. नियोजित सर्व अपाँइंटमेंट एकतर रद्द होण्याची किंवा पुढे ढकलण्याची संभाव्यता अधिक आहे. त्यामुळे आता केवळ एकच पर्याय आहे, ते म्हणजे दिल्लीतील दुतावास गाठणं. तिथे अपाँइंटमेंट मिळाली तरीही त्याठिकाणी जाणंही खूप जिकरीचं बनलं आहे. अमेरिकतील विद्यापीठात माझं अॅडमिशन पक्क झालं आहे. परंतु व्हिसामुळे सर्व घोडं अडलं आहे. शिवाय माझा अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. त्यामुळे किमान दोन आठवडे अगोदर मला त्याठिकाणी पोहचणं गरजेचं आहे"
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Education, United States of America, Visa

    पुढील बातम्या