• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या कारण

‘मी धारकाला ...रुपये..’ नोटेवर असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या कारण

आपण बाजारात काहीतरी खरेदी करण्यासाठी नोटा (Note) देतो. प्रत्येक नोटेचं एक विशिष्ट मूल्य असतं. नोटा म्हणजे एक कागद असतो

आपण बाजारात काहीतरी खरेदी करण्यासाठी नोटा (Note) देतो. प्रत्येक नोटेचं एक विशिष्ट मूल्य असतं. नोटा म्हणजे एक कागद असतो

आपण बाजारात काहीतरी खरेदी करण्यासाठी नोटा (Note) देतो. प्रत्येक नोटेचं एक विशिष्ट मूल्य असतं. नोटा म्हणजे एक कागद असतो

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : चलनी नोटा (Currency Note) किंवा नाणी (Coin). प्रत्येक देशाचे स्वतःचे एक चलन असते. अर्थव्यवस्थेत व्यवहार करण्यासाठी चलनाचा वापर केला जातो. आपल्या देशात रुपया (rupee) हे चलन असून, विविध मूल्यांच्या उदाहरणार्थ, पाच, 10, 20, 100, 200, 500 अशा अनेक प्रकारच्या नोटा उपलब्ध आहेत. आजकाल आपण डिजिटल व्यवहार अधिक करत असलो तरी पूर्वी डिजिटल सुविधा नव्हत्या तेव्हा रोख रकमेद्वारेच व्यवहार केले जात असत. त्यामुळे नोटा, नाणी हाताळण्याचा अनुभव आहे, तरीही त्यावरील अनेक महत्त्वाच्या आणि उपयुक्त बाबीबाबत आपण अनभिज्ञ असतो. आपण बाजारात काहीतरी खरेदी करण्यासाठी नोटा (Note) देतो. प्रत्येक नोटेचं एक विशिष्ट मूल्य असतं. नोटा म्हणजे एक कागद असतो. त्याला मूल्य येतं त्यावरील रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीमुळे. त्या किमतीची हमी त्याद्वारे ग्राहकाला मिळालेली असते. एक रुपयाची नोट वगळता, सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची (RBI Governor) स्वाक्षरी असते. एक रुपयाच्या नोटेवर मात्र भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. IPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट! 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) स्थापना झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या आधारावर बँकेला चलन व्यवस्थापनाची भूमिका देण्यात आली. तत्पूर्वी चलन छापण्याची जबाबदारी भारत सरकारची होती. आता भारतीय रिझर्व्ह बँक नोटा चलनात आणते. आपल्या देशात मिनिमम रिझर्व्ह सिस्टीमच्या आधारावर नोटांची छपाई केली जाते, झी न्यूज डॉट इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयुष्याच्या सरत्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ; 75 वर्षांच्या आजोबाचं लग्न कोणत्याही नोटेवर बारकाईने पाहिलं तर एक संदेश (Message) असतो. त्यामध्ये ज्या रकमेची नोट असेल त्यानुसार त्याचे मूल्य देण्याची हमी असते. ‘मी धारकाला ...रुपये देण्याचे वचन देतो’ असे प्रत्येक नोटेवर लिहिलेले असते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे दोनशे रुपयांची नोट असेल तर त्यावर मी धारकाला 200 रुपये देण्याचे वचन देत आहे, असं छापलेले असतं. याचाच अर्थ रिझर्व्ह बँकेकडे त्या दोनशे रुपयांच्या नोटेच्या मूल्याइतका सोन्याचा साठा (Gold) आरक्षित आहे. म्हणजेच देशातील अर्थव्यवस्थेत जितक्या नोटा आहेत तितके सोने रिझर्व्ह बँकेकडे सुरक्षित आहे, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे या नोटांचे मूल्य टिकून राहते. ती कायद्याने चाललेल्या राज्यातील बँकेने दिलेली हमी आहे म्हणजे कायद्याने ती नोट खरी आहे. आतापर्यंत कधी नोटेवर असे काही लिहिलेले असते आणि त्याचा असा अर्थ होतो हे बघितलं नसेल तर जरूर आपल्याकडील नोटा बघा आणि या संदेशासह अशा महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या.
  First published: