नवी दिल्ली, 31 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर्षातील पहिल्या ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी 26 जानेवारी रोजी दिल्लीतील हिंसाचाराबाबत पंतप्रधानांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्लावर झालेल्या घटनेबाबात त्यांनी प्रतिक्रिया देत तिरंग्याचा अपमान झाल्याने अतिशय दु:ख झाल्याचं व्यक्त केलं आहे. दिल्लीत तिरंग्याच्या अपमानाने संपूर्ण देश दु:खी आहे. 73 व्या ‘मन की बात’मध्ये मोदी बोलत होते. तसंच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी असामान्य काम करणाऱ्या लोकांचा देशाने पद्म पुरस्कारांद्वारे गौरव केला आहे. त्यांची कामगिरी आणि मानवतेप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वांनी माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल आपल्या कुटुंबात चर्चा करण्याचं सांगत, अशा लोकांपासून प्रेरणा मिळत असल्याचं ते म्हणाले. या वर्षापासून भारत, आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा अमृतमहोत्सव सुरू करत आहे. ज्या महान लोकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ आहे, असंही मोदी म्हणाले.
कोरोना विरोधातील लढाईला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आज भारतात जगातील सर्वात मोठं वॅक्सिनेशन अभियान सुरू आहे. कोरोनाविरोधातील भारताची लढाई एक उदाहरण ठरलं आहे. जगभरातून भारताचं मोठं कौतुक केलं जात आहे, ही संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले. सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगाने नागरिकांचं लसीकरणही केलं जात आहे. मेड इन इंडिया वॅक्सिन हे केवळ आत्मनिर्भर भारताचं प्रतिक नाही, तर ते स्वत:च्या अभिमानाचंही प्रतिक असल्याचं मोदी म्हणाले. भारताने इतर शेजारी देशांनाही मदत करण्यास सक्षम आहे कारण आज भारत औषधं आणि लशींच्या क्षेत्रात स्वावलंबी असल्याचंही मोदींनी सांगितलं.
(वाचा - जवानांवर हल्ल्याचा मोठा कट उधळला, माओवाद्यांच्या भंयकर कृत्याचा VIDEO समोर )
You must have noticed about the vaccination programme that India is able to help others because India today is self-reliant in the field of medicines and vaccines: PM Narendra Modi during 'Mann Ki Baat' radio programme pic.twitter.com/PmiLIYgDrZ
— ANI (@ANI) January 31, 2021
(वाचा - शेणापासून बनवलेल्या पेंटला मिळतेय तुफान पसंती; 12 दिवसांत इतकी विक्री )
या महिन्यात क्रिकेट पिचवरूनही अतिशय चांगली बातमी मिळाली. सुरुवातीच्या अडचणीनंतरही भारतीय टीमने जबरदस्त वापसी करत ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. हे आपल्या खेळाडूंची सांघिक वृत्ती आणि कठोर मेहनत प्रेरित करणारी आहे, असं म्हणत मोदींनी विजयाबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.