मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शेणापासून बनवलेल्या रंगाला मिळतेय तुफान पसंती; 12 दिवसांत 3500 लीटर पेंटची विक्री

शेणापासून बनवलेल्या रंगाला मिळतेय तुफान पसंती; 12 दिवसांत 3500 लीटर पेंटची विक्री

Cow paint

Cow paint

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ केलेल्या नैसर्गिक शेणयुक्त रंगाची (Cow dung paint) विक्री अवघ्या 12 दिवसांत साडेतीन हजार लीटरच्या पुढे गेली आहे.

नवी दिल्ली, 30 जानेवारी : गाईच्या शेणाच्या (Cow Dung) वापराबाबत लोकांमध्ये मतमतांतरे असू शकतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या लोकल फाॅर व्होकल (Local For Vocal) या संकल्पनेतून शेणापासून निर्मिती करण्यात येणाऱ्या पेंटला (रंग) ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या स्वप्नातील घर रंगवण्यासाठी नागरिक या पेंटचा {Paint) मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. खादी ग्रामोद्योग (Khadi Gramudyog) आणि जयपूर येथील एका इन्स्टिटयूटने संयुक्तपणे तयार केलेला हा पेंट वेगाने विक्री होत आहे.

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सूत्रांनी सांगितले, की या रंगाची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. केवळ 12 दिवसांत साडेतीन हजार लीटर पेंट किंवा रंगाची विक्री झाली आहे. ही विक्री केवळ दिल्ली आणि जयपूरमधील 2 दुकानातूनच होत आहे. खादी ग्रामोद्योगने आता या रंगाची विक्री ऑनलाईन सुरू केली आहे. यामुळे देशभरातील लोक हा रंग ऑर्डर करू शकणार आहेत.

तपासणी आणि चाचणी दरम्यानच शेणापासून बनवण्यात आलेल्या या रंगाची साडेतीन हजार लिटर विक्री झाली आहे. या रंगाच्या तपासणीचे काम अद्यापही सुरुच आहे. कोणतिही कंपनी जेव्हा पेंट किंवा रंग तयार करते तेव्हा त्यात एक वाॅलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड (VOC) असते. यात काही हानीकारक घटक असतात, पेटिंग करताना ते वास किंवा वायु स्वरुपात बाहेर पडतात. यामुळे पेटिंग करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये जळजळ सुरु होते. चाचणी किंवा अंतिम अहवालानुसार शेणापासून बनवलेल्या या पेटमध्ये व्हीओसीची मात्रा असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे कोणाताही त्रास जाणवणार नाही.

हे देखील वाचा -   5 वर्षे आणि 6 कोटींचं बिल; रुग्णालयातील चार भिंतींमध्ये पूनमचं आयुष्यचं बदललं; मात्र अजूनही हिंमत कायम!

हे एक पर्यावरणपूरक उत्पादन (Ecofriendly Product) असल्याची प्रतिक्रिया खरेदीदार ग्राहकांनी दिली असून या कारणामुळेच त्याला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. गायीपासून मिळणाऱ्या उपयुक्त पदार्थांपासून उत्पादने बनवणे हा यामागील उद्देश असून हा उद्देशच लोकांना अधिक भावताना दिसत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच रंगात रंगवलं घर

12 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा पेंट लाॅंच करण्यात आला. लाॅंच करण्यापूर्वी गडकरी यांनी या पेंटचा वापर आपल्या घराचे दरवाजे रंगवण्यासाठी केला. खादी ग्रामद्योगच्या अनेक इमारती या पेंटनेच रंगवण्यात आल्या आहेत. या पेंटच्या निर्मितीचे काम प्रामुख्याने गोशाळांमध्येच सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून शेणापासून महिना 4500 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या पेंटचे अनेक फायदे आहेत. हा पेंट अँटी बॅक्टिरियल, अँटी फंगस आहे. तुलनेने खूपच स्वस्त आहे, तसेच यात कोणत्याही घातक धातूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

First published:

Tags: Jaipur, Nitin gadkari, Painting, Pm narendra mdi