मराठी बातम्या /बातम्या /देश /

Manipur Election Results 2022: मणिपुरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, दोन्ही पक्ष 4-4 जागांवर आघाडीवर

Manipur Election Results 2022: मणिपुरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, दोन्ही पक्ष 4-4 जागांवर आघाडीवर

Manipur Election Result 2022 live updates: मणिपूर विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल हाती आला आहे.

Manipur Election Result 2022 live updates: मणिपूर विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल हाती आला आहे.

Manipur Election Result 2022 live updates: मणिपूर विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल हाती आला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मणिपूर, 10 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election result) आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल बॅलट मतांची मोजणी सुरू झाली आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Manipur Assembly Election 2022 Result) कोण बाजी मारतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून कल हाती येताना दिसत आहेत. एकूण 60 जागांपैकी 10 जागांचे कल हाती आले असून भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी चार-चार जागांवर आघाडी घेतली आहे. तर एनपीपी आणि एनपीएफ एका-एका जागेवर आघाडीवर आहे.

मणिपुरमध्ये 60 विधानसभा जागांपैकी 31 जागा जिंकणं बहुमतासाठी आवश्यक आहे. मणिपुरमध्ये एकूण दोन टप्प्यांत (28 फेब्रुवारी 2022 आणि 5 मार्च 2022) मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज म्हणजेच 10 मार्च रोजी निकाल जाहीर होत आहेत.

2017 मध्ये काय होती स्थिती?

मणिपुरमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता खेचून आणली होती. छोट्या स्थानिक पक्षांशी युती करत भाजप सत्तेवर आले. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 28 जागा जिंकल्या होत्या तर भाजपने 21 जागांवर विजय मिळवला होता. पण भाजपने अपक्षांना गळाला लावलं. एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदींसह अनेक पक्षांसोबत आघाडी करून भाजपने आपली सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत एनपीएफने 4, एनपीईपीने 4, टीएमसीने 1 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.

वाचा : Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स

मात्र या निवडणुकीत चित्र वेगळं आहे. या तिन्ही पक्षांनी यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असून, एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी 2017 पर्यंत मणिपुरात सलग 15 वर्षं काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसने चार डावे पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांसोबत युती करून यंदा निवडणूक लढवली आहे.

काय सांगतेय एक्झिट पोलची आकडेवारी?

P MARQ ने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजप 31 जागांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे. पण 'जन की बात'च्या exit poll मध्ये भाजपला थोड्या कमी जागा मिळताना दिसतात. इतर काही अंदाजांनुसार भाजपच्या जागा मणिपूरमध्ये वाढण्याची शक्यता असली तरी स्वबळावर सत्तेत येणं आणि सत्ता राखणं तितकंसं सोपं नसेल.

CNX च्या अंदाजानुसार भाजपला 26 ते 31 जागा मिळतील. पण तरीही सुस्पष्ट बहुमताच्या आकड्यापासून पक्ष दूर राहू शकतो. डिझाइनबॉक्स्डने केलेल्या सर्वेक्षणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये NPP आणि इतर पक्षांना जागा कमी मिळतील. काँग्रेस 12 ते 17 दरम्यान जागा खेचू शकतो, असं याही सर्वेक्षणात पुढे आलं आहे.

First published:

Tags: Assembly Election, BJP, Manipur, काँग्रेस