Home /News /national /

घरकाम करणाऱ्या आईची Inspiring कहाणी! मुलीला लॅपटॉप घेण्यासाठी पै-पै जोडून जमवले 35000

घरकाम करणाऱ्या आईची Inspiring कहाणी! मुलीला लॅपटॉप घेण्यासाठी पै-पै जोडून जमवले 35000

कोरोनाच्या विषाणूनं लोकांना सहा फुट अंतर ठेवण्याची शिक्षा दिली असली तरी माणुसकीनं त्यांच्यातलं अंतर मिटवलं. माणसांना जोडून ठेवलं. माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक प्रेरणादायी कहाण्यांनी या संकटावर मात करण्याचं बळ दिलं.

मुंबई, 01 जुलै: गेल्या दीड वर्षांपासून जगाला वेठीला धरलेल्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात अनेकांचे रोजगार गेले. अनेक लोक देशोधडीला लागले. अशावेळी जातपात, धर्म सगळं बाजूला ठेवून लोक एकमेकांच्या मदतीला धावले. कोरोनाच्या विषाणूनं लोकांना सहा फुट अंतर ठेवण्याची शिक्षा दिली असली तरी माणुसकीनं त्यांच्यातलं अंतर मिटवलं. माणसांना जोडून ठेवलं. माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक प्रेरणादायी कहाण्यांनी या संकटावर मात करण्याचं बळ दिलं. अशा अनेक कहाण्या सोशल मीडियावर सतत प्रसिद्ध होत असतात. अशीच एक आगळीवेगळी कहाणी सध्या ट्विटरवर चर्चेत आहे. आपल्या मुलीचं स्वप्न (Daughter’s Dream) साकार करण्यासाठी एका आईची (Mother) सुरू असलेली धडपड आणि गरीब असली तरी तिची स्वाभिमानी वृत्ती यानं भारावलेल्या गौरव वत्स (Gaurav Vats) यांनी लोकांपर्यंत ही कहाणी पोहोचावी या उद्देशानं ट्विटरवर (Twitter) ती शेअर केली आहे. हे वाचा-डॉक्टरांना असंख्य आव्हानांना द्यावं लागतं तोंड, असा असतो खडतर प्रवास गौरव वत्स यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेनं (Housemaid) एक दिवस 35 हजारांची रक्कम आणून दिली आणि त्यांना लॅपटॉप (Laptop) आणून देण्यास सांगितलं. कारण तिला मुलीला सरप्राईज द्यायचं होतं. तिची एकुलती एक मुलगी एअर होस्टेस (Air Hostess) बनण्यासाठी तयारी करत असून, त्यासाठी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहे. आपल्या मुलीला लॅपटॉप घेऊन देण्यासाठी चार घरी घरकाम करून पैसे कामावणाऱ्या या अल्पशिक्षित महिलेनं पै-पै जोडून ही रक्कम जमा केली होती. अर्थात तिनं दिलेली 35 हजारांची रक्कम उत्तम लॅपटॉप घेण्यासाठी कमी होती, तेव्हा त्यात आवश्यक रकमेची भर घालून गौरव यांनी तिच्या मुलीसाठी लॅपटॉप घेऊन दिला. लॅपटॉपची किंमत आपण दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याचं लक्षात आल्यावर या स्वाभिमानी महिलेनं ही जास्तीची रक्कम आपल्या पगारातून कापून घ्या अशी विनंती गौरव यांना केली. याबाबत सांगताना गौरव यांनी म्हटलं आहे की, जेव्हा तिला या किंमतीबद्दल कळले तेव्हा ती म्हणाली,‘ भैय्या मेरे पगार मे से एक हज़ार हर महीने का काट लेना’. त्यावर आम्ही तिला काळजी करू नका असं सांगितलं; पण तिनं आपला आग्रह सोडला नाही. तिला एकच मुलगी असून, तिला उत्तम शिक्षण देण्याची तिची जिदद आहे. या महिलेचा पाती पदवीधर असून या साथीच्या काळात त्याची नोकरी गेली आणि तेव्हापासून तिच काम करून घर चालवत आहे. हे वाचा-119 वर्षांच्या आजी; वयाचा 3 अंकी आकडा गाठूनही ठणठणीत कशा? सांगितलं सिक्रेट गौरवच्या मदतीचं युजर्सनी कौतुक केलं असून, अशा घटनाच माणुसकीवरचा विश्वास वाढवण्यास मदत करतात, जगात चांगले लोक आहेत, यावर विश्वास बसतो अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. गौरव यांनी ही कहाणी शेअर करताना 'हॅप्पी स्टोरी' असं नाव दिलं आहे, ते अतिशय चपखल आहे.

First published:

Tags: Corona, Covid-19, India, Maharashtra, Mumbai, Pandemic, Twitter

पुढील बातम्या