मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाउननं हिरावली नोकरी, पत्नीसह त्यानं स्मशानातच घेतला आसरा; मृतदेहांवर अंतिम संस्काराची उचलली जबाबदारी

लॉकडाउननं हिरावली नोकरी, पत्नीसह त्यानं स्मशानातच घेतला आसरा; मृतदेहांवर अंतिम संस्काराची उचलली जबाबदारी

कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर एका व्यक्तीने आता मृतांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी उचलली आहे. या कामात त्या व्यक्तीची पत्नीही त्याला पूर्ण मदत करते.

  • Published by:  Karishma

गुजरात, 24 एप्रिल : देशात कोरोनाची (Coronavirus) स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येसह मृतांचा आकडाही (Corona Death) वाढतो आहे. कोरोना मृतांवर अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुबियांना अनेक तास वाट पाहावी लागत असल्याचं चित्र आहे. अशातच कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर एका व्यक्तीने आता मृतांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी उचलली आहे.

लॉकडाउन (Lockdown) काळात व्यक्तीची नोकरी गेली. घरातील पुंजीही संपल्यानंतर हा व्यक्ती संपूर्ण कुटुंबासह स्मशानात राहू लागला. आता तो तिथेच राहून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याचं काम करतो. या कामात त्या व्यक्तीची पत्नीही त्याला पूर्ण मदत करते.

गुजरातमधील वडोदरा येथील स्मशानात महाराष्ट्रातील कन्हैयालाल शिर्के आपल्या कुटुंबियासोबत राहतात. कन्हैयालाल यांनी सांगितलं की, 'लॉकडाउनमध्ये त्यांची नोकरी गेली, त्यानंतर ते स्मशान घाटावर आले. येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांना, घाबरुन कोणी हात लावायलाही तयार नव्हतं. ज्यांनी आपली व्यक्ती गमावली त्यांचं दुःख मी कमी करू शकत नाही. मात्र, मृतांना अखेरचा निरोप देण्याचं काम मी करू शकतो', असं ते म्हणाले.

(वाचा - Covid Tounge चा कोरोना व्हायरसशी किती संबंध? जाणून घ्या)

कन्हैयालाल महाराष्ट्रातून रोजी-रोटीसाठी वडोदरा येथे आले होते. त्यांची पत्नी मुंबईत काही छोटं-मोठं काम करत होती. गेल्या वर्षी कन्हैयालाल यांच्या पत्नी वडोदरात आल्या आणि याचदरम्यान लॉकडाउन लागलं. लॉकडाउनमध्येच कन्हैयालाल यांची नोकरीही गेली. कन्हैयालाल मागील एक वर्षापासून वडोदरातील वासना गावातील स्मशान घाटावर राहत असून मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी निभावत आहेत.

कन्हैयालाल पेटिंगचं काम करत होते. नोकरी गेल्यानंतर त्यांनी काही दिवस मजुरीचं काम केलं, पंरतु यातही कठिण परिस्थिती होती. याचदरम्यान त्यांची पत्नी आणि मुलंही वडोदरामध्ये आले. अशात त्यांच्याकडे ना नोकरी होती, ना राहण्याचं ठिकाण. त्यानंतर त्यांनी स्मशानातच राहत, अंतिम संस्काराची जबाबदारी उचलली.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus