मुंबई, 23 एप्रिल : भारतात कोरोना (Corona) संसर्गाचा विस्फोट झाल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. ही स्थिती केवळ भारतातच नाही तर अनेक देश ट्रिपल म्युटेंट स्ट्रेनमुळे (Triple Mutant Strain) हैराण झाले आहेत. यावेळी कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वैविध्यपूर्ण लक्षणे आढळून येत आहेत. कोरोनाची सर्व लक्षणे दिसण्याऐवजी काहीच लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत. या सगळ्यात कोविड टंग (Covid Tongue) हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. कोविड टंग म्हणजे काय? कोविड टंग हे कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. हे लक्षण प्रामुख्याने जीभ आणि घश्याशी संबंधित आहे. हे लक्षण असलेल्या रुग्णांच्या जीभेची जळजळ (Inflammation) होणं आणि जखमा झाल्याचं दिसून येतं. या लक्षणांदरम्यान जीभेचा गुलाबी रंग (Pink Colour) पूर्णपणे निघून जातो आणि जीभेवर पिवळे आणि पांढरे डाग पडल्याचे दिसतात. त्याशिवाय जीभ खरबरीत झाल्यासारखी वाटते. ही आहेत अजून काही लक्षणे कोविड टंगची लक्षणे असलेल्या काही रुग्णांच्या जीभेवर पुरळ उठल्याचेही दिसून येते. यामध्ये जिभेच्या कडांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. जीभेच्या ज्या भागामुळे चवीचे ज्ञान होते, त्या भागाचे मोठे नुकसान कोविड टंगमध्ये झाल्याचे दिसून येते. केव्हापासून दिसत आहेत ही लक्षणे? कोविड-19 संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या SARS-COV-2 हा विषाणू मागील काही महिन्यांपासून आपल्या स्वरुपात सातत्याने बदल करतोय. हा बदल जसा संरचनात्मक झाला आहे तसाच तो विषाणूच्या प्रभाव आणि वर्तनात देखील झाला आहे. मागील 5 महिन्यांपासून कोविड टंग ही समस्या व्यापक स्वरुपात पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झाला तर चव गेल्याची उदाहरणे पाहायला मिळत होती. त्यापूर्वी वास (Smell) घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचेही दिसून येत होते. असे होतात कोरोनाची सहज शिकार संशोधकांच्या मते, कोविड टंग या लक्षणाचा संबंध ACE2 या प्रोटीनशी जोडला गेलेला आहे. ACE2 म्हणजे एन्जियोटेंन्सिन कन्व्हर्टींग एन्झामाईन 2. हे एक पृष्ठभाग प्रोटीन (Protein) असून ते माणसाच्या जीभेच्या पृष्ठभागावर विपुल प्रमाणात उपलब्ध असते. SARS-COV-2 हा प्रामुख्याने या ACE2 या प्रोटीनवर हल्ला करतो. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोरोना टंग हे लक्षण प्रामुख्याने दिसून येत आहे. कोविड टंगची ही देखील असू शकतात कारणे जर कोणत्या व्यक्तीत कोविड टंगची लक्षणे दिसली तर तो व्यक्ती कोरोनाबाधित आहे असे नाही. सूज, फोड, आंबटपणा, गडद डाग हे मसालेदार, पित्तकारक भोजनाच्या सेवनामुळे किंवा जीवाणूच्या बुरशीजन्य (Bacteria) संक्रमणामुळे देखील असू शकते. अशी लक्षणे दिसल्यास काय करावे? जर अशी लक्षणे दिसली तर घाबरुन जाऊ नये. याबाबत तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे सर्वसामान्यपणे कोरोना संसर्ग झाला तर दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे. जर रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार औषधोपचार सुरु करावेत. या लक्षणांबद्दल कधीही फार स्पष्टपणे चर्चा झालेली नाही. कारण बहुतेक डॉक्टर केवळ कोरोना रिपोर्ट आणि इतर लक्षणांच्या जोरावर रुग्णावर उपचार सुरु करतात. तसेच रुग्ण देखील भितीमुळे या लक्षणांची माहिती डॉक्टरांना देत नाहीत. अनेक केसेसमध्ये केवळ रिपोर्ट पाहून रुग्णावर उपचार केले जातात, रुग्णाच्या अन्य लक्षणांकडे (Symptoms) फारसे लक्ष दिले जात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.