पोटदुखीची तक्रार घेऊन आला तरुण; एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टरही झाले शॉक

पोटदुखीची तक्रार घेऊन आला तरुण; एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टरही झाले शॉक

या व्यक्तीने आपण तोंडावाटे हेडफोन केबल गिळल्याचं सांगितलं मात्र एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टरांना खरी परिस्थिती समजली.

  • Share this:

गुवाहाटी, 05 जून : आसाममधील (Aasam) एका रुग्णालयात 30 वर्षांची व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन आला. या व्यक्तीने आपण मोबाइल हेडफोनची केबल (mobile headphone cable) गिळल्याचं सांगितलं. मात्र एक्स-रे (x-ray) पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. कारण डॉक्टरांना त्याच्या अन्ननलिकेत नव्हे तर मूत्राशयात वायर असल्याचं दिसलं.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने तोंडावाटे आपण केबल गिळल्याचं सांगितलं. मात्र एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टरांना खरी परिस्थिती समजली.

गुवाहाटीतील सर्जन डॉ. वालियुल इस्लाम म्हणाले, "हा रुग्ण आमच्या ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन आले. त्याने चुकून मोबाईल हेडफोनची केबल गिळल्याचं सांगितलं. आम्ही त्याच्या मलाची तपासणी केली, तसंच एन्डोस्कोपीही केली मात्र आम्हाला केबल मिळाली नाही. त्याच्या अन्ननलिकेत काहीच नव्हतं"

यानंतर डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. तो पाहून डॉक्टरांना धक्का बसला कारण त्याच्या मूत्राशयात केबल असल्याचं दिसलं.

डॉ. इस्लाम म्हणाले. "त्याने आम्हाला सांगितलं की, त्याने हेडफोन केबल गिळली. मात्र खरं तर त्याने त्याच्या पेनिसमधून (penis) ही केबल आत टाकली होती. मी गेली 25 वर्षे शस्त्रक्रिया करत आहे, मात्र आतापर्यंत असं प्रकरण पहिल्यांदाच पाहिलं"

हे वाचा - पेनकिलरमुळे महिलेच्या शरीराची झाली आग; कल्पनाही करणार नाही अशी झाली अवस्था

डॉक्टरांच्या मते, या रुग्णाला कोणतीही मानसिक समस्या नाही, तो लैंगिक सुखासाठी हे करत होता. लैंगिक सुख अनुभवण्यासाठी या रुग्णाला केबल आणि इतर वस्तू पेनिसमध्ये घालण्याची सवय आहे. यावेळी असंच काही करत असताना ही केबल त्याच्या मूत्राशयापर्यंत पोहोचली.

डॉ. इस्लाम म्हणाले, "हा हस्तमैथुनाचा प्रकार आहे, याला urethral sounding असं म्हणतात. म्हणजे मूत्रमार्गात एखादी वस्तू किंवा द्रव टाकणं. पुरुष अशा पद्धतीने लैंगिक सुख अनुभवतात हे माहिती आहे. मात्र ही व्यक्ती इतकी वाहत गेली की केबल मूत्राशयात पोहोचली. हे खूप दुर्मिळ आहे"

हे वाचा - घरकामाला आली महिला आणि 20 जणांना झाला कोरोना, 750 क्वारंटाइन

"हा रुग्ण मूत्रमार्गात केबल टाकल्याच्या पाच दिवसांनंतर आमच्याकडे आला. तो वारंवार आम्हाला तोंडावाटे केबल शरीरात गेल्याचं सांगत होता. एखादी प्रौढ व्यक्ती असं खोट बोलेल अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. जर त्याने आम्हाला खरं सांगितलं असतं, तर आम्ही शस्त्रक्रिया केली नसती. ज्या ठिकाणाहून त्याने केबल शरीरात टाकली होती, तिथूनच आम्ही बाहेर काढू शकलो असतो. मात्र तो खोटं बोलल्यामुळे आम्हाला शस्त्रक्रिया करावी लागली", असं डॉ. इस्लाम म्हणाले.

रुग्णाची शस्त्रक्रिया करून केबल शरीराबाहेर काढण्यात आली. रुग्ण आता बरा होत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - World Environment Day - लॉकडाऊनमध्ये तज्ज्ञांना सापडला प्रदूषण नियंत्रणाचा मार्ग

First published: June 5, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या