मराठी बातम्या /बातम्या /देश /

2 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली

2 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली

गेल्या दोन वर्षांपासून हा व्यक्ती पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खिळलेला आहे. शिवाय या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

हैद्राबाद, 16 एप्रिल : तेलंगणात कोविड – 19 (Coronavirus) च्या रुग्णांमुळे आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. येथील एका 44 वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा कोरोनामुळे (Covid -19) मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती या महिन्याच्या सुरुवातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. विशेष म्हणजे पॅरालिसिसमुळे दोन वर्षांपासून तो अंथरुणाला खिळून होता.

या प्रकरणानंतर आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. या व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यामुळे मेडिकल टीम या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्यामागचं कारण शोधत आहेत. याशिवाय मृत व्यक्तीच्या कुटुंबातील तीनही सदस्यांची कोविड चाचणी नेगेटिव्ह आली आहे. शिवाय त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. या प्रकरणामुळे राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनची चिंता निर्माण झाली आहे. तेलंगणा सरकारने सध्या राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन नसल्याचे सांगितले जात आहे.

गांधी रुग्णालयात दाखल

या व्यक्तीला 26 मार्च रोजी हैद्राबाच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले आणि ह्रदयासंबंधित आजारावर उपचार सुरू होता. त्यानंतर त्यांना उस्मानिया जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी व्यक्तीची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आणि त्यांना तेलंगणातील कोविड – 19 रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पॅरालिसिस असल्याने ते कोणाच्या मदतीशिवाय चालू शकत नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथे असताना कोणतीही लक्षणे दिसली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

संबंधित -मुंबईत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, 3585 व्यक्तींच्या चाचणीत 5 जणं बाधित

जगाच्या Covid - 19 लढ्यात भारताची साथ, मॉरिशस सरकारने मानले PM मोदींचे आभार

First published:

Tags: Corona virus in india