Home /News /national /

घरात भक्तीगीतांसाठी स्पीकर लावल्यावरून सुरू झाला वाद; मात्र, शेवट इतका भयानक

घरात भक्तीगीतांसाठी स्पीकर लावल्यावरून सुरू झाला वाद; मात्र, शेवट इतका भयानक

दोन्ही भावांना गंभीर दुखापत झाली होती. नंतर त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी जसवंत यांना मृत घोषित केलं, तर, अजित यांचा हात फ्रॅक्चर झाल्यानं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

पुढे वाचा ...
    मेहसाणा, 7 मे : कधी कधी लहान-सहान कारणांवरून सुरू झालेले वाद विकोपाला जातात आणि काहीतरीच होऊन बसतं. वाद सुरू झाल्यानंतर कोणताच पक्ष मागे हटायला तयार नसतो. अशात नको तो प्रकार होऊन जातो. असाच प्रकार घडून एका 42 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या व्यक्तीच्या घरातल्या मंदिरात भक्तीगीतं वाजवण्यासाठी स्पीकर लावल्यावरून शेजाऱ्यांसोबत वाद सुरू झाला. तो विकोपाला जाऊन झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा जीव गेला तर, त्याच्याच मोठ्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका घरात बांधलेल्या मंदिरात भक्तीगीते वाजवण्यासाठी स्पीकर वापरल्याच्या वादातून एका 42 वर्षीय व्यक्तीला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. लंघनाज पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एस. बी. चावडा यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील मुदर्डा गावात 3 मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली. "आम्ही एफआयआरमध्ये नाव असलेल्या सहा पैकी पाच जणांना अटक केली आहे. ठाकोर कुटुंबाने त्यांच्या घराच्या आत बांधलेल्या छोट्या मंदिरात लावलेल्या स्पीकरच्या संदर्भात शाब्दिक वादावादी झाल्यानंतर त्यांनी मृत जसवंत ठाकोर आणि त्यांचा मोठा भाऊ अजित यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला," असं चावडा म्हणाले. हे वाचा - झोपेतच मृत्यूनं गाठलं; इमारतीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू अजित यांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे 4 मे रोजी एफआयआर नोंदवण्यात आली. त्यात म्हटलं आहे की, ठाकोर कुटुंबाने मुदर्डा गावात त्यांच्या घराच्या आवारात देवी मेलडीचं छोटं मंदिर बांधलं होतं. 3 मे रोजी सायंकाळी अजित यांनी मंदिरात दिवा लावून भक्तिसंगीत वाजवण्यास सुरुवात केली. स्पीकरच्या वापरामुळे नाराज झालेले दुसरे गावकरी सदाजी ठाकोर त्यांच्या घरी आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला, असं सांगण्यात आलं. "अजित यांनी स्पीकरचा आवाज आधीच कमी असल्याचं सांगितल्यावर, सदाजी आणि जयंती ठाकोर आणि विनू ठाकोरसह इतर पाच जण संतप्त झाले आणि त्यांनी ठाकोर बंधूंना काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. हे वाचा - लग्नाचा दिवसच ठरला वाईट; नवरदेवाच्या डोळ्यात अश्रू तर नवरीही चक्कर येऊन पडली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि भावांना रुग्णवाहिकेतून मेहसाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं,” असं चावडा म्हणाले. दोन्ही भावांना गंभीर दुखापत झाली होती. नंतर त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी जसवंत यांना मृत घोषित केलं, तर, अजित यांचा हात फ्रॅक्चर झाल्यानं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Song, Temple, वाद

    पुढील बातम्या