Home /News /national /

Indore Fire: इमारतीला भीषण आग, काही मिनिटातच 7 जणांचा होरपळून मृत्यू; 8 जखमी

Indore Fire: इमारतीला भीषण आग, काही मिनिटातच 7 जणांचा होरपळून मृत्यू; 8 जखमी

Indore Fire: इंदूरमध्ये (Indore) शुक्रवारी रात्री एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू (7 People Died) झाल्याचं समजतंय.

    मध्य प्रदेश, 07 मे: इंदूरमध्ये (Indore) शुक्रवारी रात्री एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू (7 People Died) झाल्याचं समजतंय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विजय (Vijay Nagar) नगरच्या स्वर्णबाग (Swarnabagh Nagar)नगरमध्ये ही घटना घडली आहे. इंदूरच्या विजय नगरमधील एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. यामध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. या इमारतीत राहणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीररित्या भाजले आहेत. सर्व जखमींना एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. आगीनं लगेचच भीषण रूप धारण केलं. काही समजण्याआधीच काही जण होरपळले तर काही जण गुदमरले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. मृतांमध्ये ईश्वर सिंग सिसोदिया (45), नीतू सिसोदिया (45), आशिष (30), गौरव (38), आकांक्षा (25) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 आणि 45 वयोगटातील दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्या फक्त एक ग्लास थंड दूध; बदल्यात मिळवा हे कमालीचे फायदे मिळालेल्या माहितीनुसार, खजराना रिंग रोडवरील स्वर्ण कॉलनीतील इमारतीला आग लागली. येथे 13 दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जळून खाक झालं आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत इन्साद पटेल यांची आहे. येथे 10 फ्लॅट होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीतून 9 जणांची सुटका करून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Indore News, Madhya pradesh

    पुढील बातम्या