नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या निवडणूकीचे (Election) वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. येत्या काळात भाजप आणि तृणमूल काग्रेसमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहेत. सध्या प्रमुख नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरुन सुरु असलेली टिका-टिप्पणी निवडणूकीचे रण अधिकच तापवत आहे. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerji) अग्रभागी असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वैशिष्ठपूर्ण भाषणशैलीसाठी जशा ओळखल्या जातात, तशाच अनोख्या घोषणाबाजीसाठी देखील त्या परिचित आहेत. निवडणुका असोत की इतर राजकारणी किंवा कायद्यावर केलेली टिका त्यांची घोषणाबाजी निश्चितच लक्ष वेधून घेत असते. `सिएए सिएए ची ची` या त्यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या घोषणेनंतर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेच्या विषय ठरल्या आहेत, ते त्यांच्या अनोख्या भाषणशैलीसाठी. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी तृणमूल काॅंग्रेसकडून (TMC) प्रचाराचे रण तापवले जात असून, त्यात ममता बॅनर्जी यांची भाषणे विशेष आकर्षण ठरत आहेत.
मुर्शिदाबादमध्ये एका जाहिर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की मीरजाफर प्लासीच्या लढाईत ब्रिटीशांमध्ये सामिल झाल्याने काही खोडकर गायींनी भाजपमध्ये जाण्यासाठी पक्ष सोडला आणि आता त्या फार आवाज करीत आहेत, हम्बा हम्बा, रम्बा रम्बा,कम्बा कम्बा, डुम्बा डुम्बा, बुम्बा बुम्बा, बोंबा बोंबा. त्यामुळे त्यांनी लवकर पक्ष सोडले ते चांगले झाले, असेही त्या म्हणाल्या. हम्बा हम्बा हा गायीने खोदून काढलेला आवाज आहे.
हम्बा हम्बा, रम्बा रम्बा,कम्बा कम्बा, डुम्बा डुम्बा, बुम्बा बुम्बा, बोंबा बोंबा असे ममता बॅनर्जी यांनी सभेत संबोधित करताना केलेल्या उच्चारांची 7 मिनिटांची क्लिप व्हायरल झाली असून, त्याचे मेम्ससध्या व्टिटरवर (Twitter) धुमाकूळ घालत आहेत.
Editor: Where's the article? Me: pic.twitter.com/2fcysMxjJO
— Naila Inayat (@nailainayat) February 10, 2021
Me, trying to read my doctor's handwriting pic.twitter.com/oKf3wIFV6u
— Sagar (@sagarcasm) February 10, 2021
Best rappers in India:
3. Divine 2. Naezy 1. pic.twitter.com/JeMB3uf8Gw — Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) February 10, 2021
wait for it 😺 pic.twitter.com/4EfTi27ckp
— Dr. Gill 2.0 (@ikpsgill1) February 10, 2021
Didi gave tough competition 😭😂😂😂 pic.twitter.com/nRW6IbgBqu
— Babu Raowl (@RaowlGandhi) February 10, 2021
बॅनर्जी यांनी आपल्याच पक्षातील वाळंवटाचा उल्लेख करताना सांगितले, की भाजप काही लोकं खरेदी करु शकते पण मी त्यांना पश्चिम बंगाल भाजपला विकू देणार नाही. भोगी, लोभी आणि त्यागी असे तीन प्रकारचे नेते असतात. त्यापैकी भोगी आणि लोभी हे त्यांच्या विचारधारा विकू शकतात, परंतु त्यागी हे अशा लोकांपुढे स्वतःला कधीच विकू शकणार नाहीत. मला आनंद आहे की टीएमसीला अशाच एका लोभीपासून मुक्त केले आहे.
हे देखील वाचा - 'आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने लक्ष घाला', उदयनराजेंची शरद पवारांना विनंती
नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर टीएमसीचे माजी नेते सुवेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी, बैशली दालमिया, प्रबीर घोषाल, रतीन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी भाजपत (Bjp) प्रवेश केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Mamata banerjee, TMC, West bengal