पुणे, 10 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोनाचा (Coronavirus) सर्वाधिक फटका बसल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. देश कोरोनाशी (Covid - 19) लढा देत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचा गुणाकार होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. अशावेळी सर्वजण आपआपल्या परीने मदत करीत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात धोबीचं काम करणारे संजय परदेशी यांच्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कपडे धुण्याच्या यंत्राची सोय करुन दिली आहे.
याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ‘धोबी कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरील हे समाधान माझ्या कामाचा उत्साह वाढवणारं आहे. डॉ. नायडू रुग्णालयात गेलो असताना धोबी पदावर असलेले संजय परदेशी यांच्याशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी कपडे धुण्यासाठी मशीन असावी, अशी अपेक्षा माझ्याकडे बोलून दाखवली. त्यावर आपण तातडीने दखल घेत इंडस्ट्रीयल वॉशिंग मशीन खरेदीची प्रक्रिया सुरू केली आणि अवघ्या १५ दिवसांच्या आतच मशीन दाखल होऊन कार्यान्वित होत आहे. त्यासाठी महापौर निधीतून जवळपास ३ लाख ५० हजार रुपये उपलब्ध करुन दिले. मशीन दाखल झाल्यावर परदेशी यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून बरं वाटलं. हेच माझ्या कामाचा उत्साह वाढवणारे आहे. कारण परदेशी हे आजपर्यंत स्वतः हाताने कपडे धुवत होते. सध्या देश संकटात आहे. त्यामुळे सध्या अनेक मदतीचे हात समोप येत आहे. पुण्याच्या महापौरांनी धोब्याच्या कष्टाची दखल घेत त्यांना मशीन उपलब्ध करुन दिली आहे. संबंधित - लॉकडाऊनमध्ये गच्चीवर रंगला जुगाराचा डाव, पोलिसांचा ड्रोन आला आणि…