नवी दिल्ली, 15 एप्रिल : गेल्या महिन्याभरापेक्षाही अधिक काळापासून देशभरात उष्णतेची लाट (Heat Wave) आहे. उत्तर, वायव्य आणि मध्य भारतात तापमानानं उच्चांक गाठला आहे. इथं दररोजचं कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर पोहोचलं आहे. ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू, राजस्थान, महाराष्ट्र (विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ) येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मात्र, देशातल्या दक्षिण आणि ईशान्य भागात पावसाची (isolated heavy rain) शक्यता आहे. येथील तापमान 40 ते 42 अंशांवर राहील. काही ठिकाणी ते 2 ते 3 अंशांनी वाढण्याचीही शक्यता आहे.
Isolated very heavy rainfall also very likely over South Interior Karnataka on 17th April, 2022. pic.twitter.com/pohV7Y4Hlr
— India Meteorological Department (@Indiametdept) April 15, 2022
17 एप्रिल, 2022 रोजी दक्षिण कर्नाटकात अंतर्गत प्रदेशात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. तामिळनाडूच्या घाट भागात 15 एप्रिल ते 17 एप्रिलदरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 16 ते 17 एप्रिलदरम्यान केरळ, 15 ते 18 एप्रिल दरम्यान दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागांत आणि 15 एप्रिलला उत्तर कर्नाटकात अंतर्गत भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हे वाचा - बाटलीचं झाकणच घशात अडकलं; 9 वर्षीय विद्यार्थ्यासोबत पुढे काय घडलं पाहा, VIDEO पुढील 5 दिवसांत केरळ-माहे, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी पडेल. पुढील 5 दिवसांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. हे वाचा - Russia-Ukraine युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम? यादरम्यान अरुणाचल प्रदेश आणि आसाम-मेघालयात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 ते 17 एप्रिलदरम्यान आणि 17 एप्रिलला नागालँड-मणिपूर-मिझोराम-त्रिपुरा येथे मुसळधार पाऊस पडेल. पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय आणि नागालँड-मणिपूर-मिझोराम-त्रिपुरा येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.