महाराष्ट्राचा धोका वाढतोय, देशातल्या या 7 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय कोरोना

महाराष्ट्राचा धोका वाढतोय, देशातल्या या 7 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय कोरोना

देशातल्या सात राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वेगाने कोरोना पसरत असल्याचं त्यात आढळून आलं असून त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 एप्रिल: लॉकडाऊन सुरू असतानाही देशात कोरोनाचा वेग मंदावला मात्र थांबलेला नाही. दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढच होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातल्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा IIT दिल्ली अभ्यास करत असून त्यासाठी त्यांनी PRACRITI हा डॅशबोर्ड तयार केला आहे. देशातल्या सात राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वेगाने कोरोना पसरत असल्याचं त्यात आढळून आलं असून त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. तर गुजरात या राज्यामध्ये इन्फेक्शन पसरण्याचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचंही आढळून आलं आहे.

सर्वाधिक वेगाने कोरोना पसरत असलेल्या राज्यांमध्ये झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि गुजरात ही ती राज्य असून देशातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन तृतिआंश रुग्ण हे या राज्यांमध्ये आहेत. देशातल्या 19 राज्य आणि 100 जिल्ह्यांमध्ये 60 टक्के कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोनाबाधित रुग्णामुळे इन्फेक्शन पसरण्याचा वेग हा 3.3 एवढा असून तो देशात सर्वात जास्त आहे. तर अशा प्रकारचं इन्फेक्शन पसरण्याची राष्ट्रीय सरासरी ही 1.8 एवढी आहे.

गुजरातमध्ये शुक्रवार पर्यंत बाधितांची संख्या 2,815 एवढी झाली आहे. सगळी राज्य सरकारे युद्ध पातळीवर कोरोनाविरुद्ध लढाई लढत असून काही राज्यांनी त्यात यश मिळवलं आहे. तर काही राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे.

हे वाचा -  केरळसह या 8 राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे

कोरोना विषाणूची प्रकरणं वाढतच आहेत. शनिवारी सकाळी कोविड -19 मधील रुग्णांची संख्या 24 हजारांवर पोहोचली. तर 775 लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 24,506 झाली आहे. यात आतापर्यंत 5063 रूग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 57 मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त 1429 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

हे वाचा - पंतप्रधान मोदींकडून रमजानच्या शुभेच्छा; म्हणाले कोरोनाविरोधातील लढा नक्की जिंकू

महाराष्ट्रात कोरोनाचे 6817 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 840 आहेत जे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्याचवेळी, 301 लोक मरण पावले आहेत. गुजरातमध्ये 2815 रुग्ण आढळले आहेत. त्यातून 265 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, 127 लोक मरण पावले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोलताना आतापर्यंत कोविड -19चे 2514 रुग्ण आढळले आहेत. 857 लोक बरे झाले आहेत. त्याचवेळी 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

First published: April 25, 2020, 3:57 PM IST

ताज्या बातम्या