Home /News /news /

पंतप्रधान मोदींनी रमजानच्या दिल्या शुभेच्छा; म्हणाले, कोरोनाविरोधातील लढा नक्की जिंकू!

पंतप्रधान मोदींनी रमजानच्या दिल्या शुभेच्छा; म्हणाले, कोरोनाविरोधातील लढा नक्की जिंकू!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरोनाविरोधातील लढा जिंकू अशा विश्वास व्यक्त केला

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : रमजानचा (Ramzan) महिना सुरू झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रमजानसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी म्हणाले की, आम्ही कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरूद्ध लढा नक्कीच जिंकू. याबाबत पीएम मोदी यांनी ट्विट केले की, 'रमजान मुबारक! मी सर्वांच्या सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना दया, बंधुता आणि करुणा पसरवतो. आपण कोरोना विषाणूविरूद्ध लढा जिंकू आणि निरोगी जग निर्माण करण्यात यशस्वी होऊ.' चंद्र दिसला, शनिवारी पहिला रोजा शनिवारी दिल्लीसह संपूर्ण देशात रमजानचा महिना सुरू होत आहे. शुक्रवारी सायंकाळी रमजानचा चंद्र दिल्लीसह देशाच्या विविध भागात दिसला. कोरोना विषाणूचा विचार करता मुस्लीम समुदायांना त्यांच्या घरी प्रार्थना करण्याचं आवाहन उलेमा यांनी केलं आहे दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकरराम अहमद यांनी पीटीआयला सांगितले की, "मी जाहीर करतो की उद्या दिल्लीत पहिला रोजा होईल." इम्रात-ए-शरिया-हिंद या मुस्लीम संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी राजधानीत रुयत-ए-हिलाल समितीच्या बैठकीत, दिल्लीत चंद्र दिसल्याची पुष्टी झाली. याशिवाय देशाच्या अनेक भागातही चंद्राचे दर्शन झाले आहे. समितीचे सचिव मौलाना मुईजुद्दीन यांनी जाहीर केले की, "25 एप्रिल 2020 रोजी रमजान महिन्याची पहिली तारीख असेल." मुफ्ती मुकरम म्हणाले, 'बिहार, कोलकाता, रांची आणि हरियाणासह अनेक ठिकाणी चंद्र दिसला आहे.' जामा मशिदीचे शाही इमाम म्हणाले, ‘घरात रहा, खबरदारी घ्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनीही शनिवारी पहिला रोजा होण्याची घोषणा केली आणि मुस्लीम समाजाला रमजानसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, लॉकडाउन लागू आहे त्यामुळे लोकांनी घरात राहावे आणि शक्य तितकी सावधगिरी बाळगावी. जुन्या दिल्ली आणि यमुनापारच्या अनेक मशिदींनीही शनिवारी पहिला रोजा होण्याची घोषणा केली. यासह मशिदींमधून जाहीर करण्यात आले की यावेळी मशिदींमध्ये कोणत्याही प्रकारचा उपक्रम होत नसल्याने नागरिकांना त्यांच्या घरी प्रार्थना करावी. संबंधित -पोलिसाने गर्भवतीला पोहोचवलं रुग्णालयात, महिलेने बाळाला दिलं त्यांचं नाव
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या