नवी दिल्ली, 25 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 23 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग गेल्या काही दिवसात कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. काही राज्यांनी नियमांचं पालन करून केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करत काही दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 11 राज्यांनी कोरोनावर मात केली आहे. या राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत किंवा काही राज्य कोरोनामुक्त झाले आहेत. छत्तीसगड छत्तीसगड जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. इथे 36 रुग्णांपैकी 30 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हरियाणा-हरियाणामध्ये आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 272 रुग्ण आढळले होते. 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अंदमान निकोबार-अंदमान निकोबार इथे कोरोनाग्रस्तांची संख्या 22 होती त्यापैकी 11 जणांवर उपचार यशस्वीपणे पार पडले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा- लॉकडाऊनमुळे घरात वाहिला रक्ताचा पाठच; चाकू, स्क्रूडायव्हरने जोडप्लाला संपवलं गोवा-सध्या गोव्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. इथे 7 रुग्ण आढळले होते. त्या सर्व रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे पार पाडली आहे. राज्यात कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला आहे. केरळ- केरळमध्ये 450 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यापैकी 311 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. केरळमध्ये आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेश- इथे कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. त्याच्यावरील उपचार यशस्वी झाले आहेत. या रुग्णाला घरी पाठवण्यात आलं आहे. सध्या या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत. आसाम-कोरोनाग्रस्तांची संख्या 36 होती आणि त्यापैकी 19 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत. मणिपूर- मणिपूरमध्ये सध्या कोरोनाचे कोणताही रुग्ण आढळला नाही. दोन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर यशस्वीपणे इलाज करण्यात आला आहे. त्रिपुरा- कोरोनाग्रस्तांची संख्या 2 होती त्यापैकी एकावर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा- मनसेचे नेते संजय राऊतांवर संतापले, राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर दिलं प्रत्युत्तर संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.