

कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे सध्या टीव्हीवर नवं काहीही येत नाही. त्यामुळे सध्या जुन्याच मालिका किंवा सिनेमा पाहाव्या लागत आहेत. पण युट्यूबवर मात्र काही शॉर्ट फिल्म आहेत ज्या तुम्ही अद्याप पाहिल्या नसतील तर तुमच्यासाठी त्या खूप चांगला पर्याय ठरू शकतात.


काजोल,मुक्ता बर्वे, श्रुती हसन, नेहा धुपिया आणि इतर 9 अभिनेत्रींच्या भूमिका असलेली देवी ही शॉर्ट फिल्म अशा 9 स्त्रियांची कथा आहे. ज्या वेगवेगळ्या परिस्थितीतून आल्या आहेत मात्र त्यांची समस्या एकच आहे.


शेफाली शाहाची महत्त्वाची भूमिका असलेली ही शॉर्ट फिल्म एक सामान्य घरातील डिनरची कथा आहे. ज्यात घरातली स्त्री काम करत राहते आणि तिचा पती पार्टी एन्जॉय करत असतो.


ही एक सायकॉलॉजिकल थ्रिलर स्टोरी आहे. यामध्ये मनोज वाजपेयी आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


'नींद' ही एका अशा महिलेची कथा आहे. जी आपल्या आवजाच्या जादूनं झोप न येणाऱ्या लोकांना ठीक करत असते. एक दिवस तिच्याकडे एक असा पेशंट येतो जो 20 वर्षांपासून झोपलेलाच नसतो.


तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेली ही शॉर्ट फिल्म मुलीच्या सेल्फ डिफेन्सवर आधारित आहे. ज्यात तापसीनं सेल्फ डिफेन्स ट्रेनरची भूमिका साकारली आहे. मात्र एक दिवस तिचा भाऊच एक मुलीसोबत गैरवर्तन करतो...


गुनीत मोंगा यांचं दिग्दर्शन असलेली ही शॉर्टफिल्म एक छोटी डॉक्यूमेंटरी आहे. ज्यात भारतातील गरीब मुली आणि महिला पिरियडच्या दिवसात कशा वस्तू वापरतात याचं चित्रण करण्यात आलं आहे.


टिस्का चोप्राची ही शॉर्ट फिल्म पाहिल्यावर समजतं की त्या किती कमालीच्या अभिनेत्री आहेत. ही कथा थोडी वेगळ्या धाडणीची आणि भयानक ट्विस्टसोबत येते.